गुणवत्ते बरोबरच तंदुरुस्त शरीर देखील महत्वाचे  – आ. आशुतोष काळे

0

कोळपेवाडी वार्ताहर :-मागील दोन वर्ष कोविडमुळे शाळा बंद असल्यामुळे खाजगी शाळांनी ऑनलाईन शिक्षणावर भर देवून गुणवत्ता टिकवून ठेवण्यात यशस्वी झाल्या. जिल्हा परिषद शाळांनी देखील या प्रतिकूल परिस्थितीत आपली गुणवत्ता टिकवून ठेवली हि अभिमानास्पद बाब असून गुणवत्ते बरोबरच तंदुरुस्त शरीर देखील अत्यंत महत्वाचे असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले.

            कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोऱ्हाळे येथे ९ लक्ष ६५ हजार रुपये निधीतून बनवण्यात आलेल्या ओपन जिम व २ लक्ष रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या नवीन संगणक कक्षाचे लोकार्पण नुकतेच आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच त्यांचे आरोग्य देखील अतिशय महत्वाचे आहे. बालवयातच व्यायामाच्या सवयीमुळे भविष्यकाळात शरीर तंदुरुस्त राहिल्यास मोठी मदत होवून विद्यार्थ्यांना अपेक्षित उद्दिष्ट्य साध्य करता येवू शकते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे धडे गिरवतांना ओपन जिमच्या माध्यमातून शरीर समृद्ध करावे असा मौलिक सल्ला दिला. स्पर्धेच्या युगात संगणकीय ज्ञान अत्यंत महत्वाचे असून जिल्हा परिषदेची प्रत्येक शाळा संगणकीकृत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.   

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर करखान्याचे संचालक वसंतराव आभाळे, प्रविण शिंदे, शंकरराव चव्हाण, रोहिदास होन, सरपंच योगिराज देशमुख, उपसरपंच अनिल डुबे, देर्डे कोऱ्हाळे सोसायटीचे चेअरमन विकास दिघे, देर्डे चांदवड सोयासायटीचे चेअरमन विष्णु विघे, कृष्णा शिलेदार, भाऊसाहेब कुऱ्हाडे, नरेंद्र देशमुख, नंदकिशोर औताडे, गौतम विघे, कचेश्वर डुबे, शिवाजीराव होन, प्रकाश देशमुख, नारायण शिलेदार, राजेंद्र शितोळे, बाबासाहेब विघे, राधाकृष्ण डूबे, अशोक डुबे, काशिनाथ डुबे, संजय विघे, दत्तात्रय डुबे, अर्जुन दिघे, दत्तात्रय देशमुख, राजेंद्र डुबे, शामराव शिलेदार, उत्तमराव माळी, वाल्मिक डुबे, दौलत गव्हाणे, संदीप कोल्हे, विलास डुबे, सिताराम शिंदे, दत्तात्रय जाधव, बाबासाहेब कोल्हे, सचिन विघे, कैलास श्रीपत डुबे, सुदाम शिंदे, सुभाष शिंदे, बच्चु शिकारे, भागवत विघे, सुभाष सावंत, शांताराम डुबे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळ- देर्डे कोऱ्हाळे येथे ओपन जिम व नवीन संगणक कक्षाचे लोकार्पण प्रसंगी आ. आशुतोष काळे व मान्यवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here