गोसावी कुटुंबाला “यशोधनच्या” वतीने किराणा किट ; घरकुल देण्यासाठीही प्रयत्न करणार – इंद्रजीत थोरात

0

संगमनेर : ऐन दीपावलीत झालेल्या जोरदार पावसाने तालुक्यातील सुकेवाडी येथील  शेतमजूर भाऊसाहेब लहानू गोसावी यांच्या घराची पूर्ण पडझड झाली. दीपावलीच्या दिवशीच घर पडल्याने गोसावी कुटुंब उघड्यावर पडले. त्यामुळे या कुटुंबाला माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार यशोधन कार्यालयामार्फत किराणा किट देण्यात आली तसेच पीडित कुटुंबाला लवकरात लवकर घरकुल मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक इंद्रजीत थोरात यांनी सांगितले.

         सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक इंद्रजीत थोरात, विश्वगुरू शंकराचार्य दशनाम गोस्वामी समाजाचे प्रदेशाध्यक्ष शरद भागवत गिरी यांच्यासह सुकेवाडीचे उपसरपंच सुभाष कुटे यांनी भाऊसाहेब गोसावी यांच्या घरी जात पडलेल्या घराची पाहणी केली व गोसावी कुटुंबाला धीर दिला. यावेळी बोलताना इंद्रजीत थोरात म्हणाले की, संगमनेर तालुका हा एक परिवार आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील प्रत्येक वाडी वस्तीवरील गोरगरिबाच्या विकासासाठी आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सातत्याने काम केले जात आहे. यावर्षी तालुक्यात अनेक ठिकाणी जास्त पाऊस झाला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याचबरोबर गोरगरिबांच्या घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त लोकांच्या शेती व पडझड झालेल्या घरांची प्रशासनाने तातडीने पंचनामे करून त्यांना त्वरित नुकसान भरपाई दिली पाहिजे असे सांगून इंद्रजीत थोरात म्हणाले की भाऊसाहेब गोसावी हे गरीब शेतमजूर आहेत. ऐन दिवाळीत त्यांंचे घर पाडल्याने हे कुटुंब उघड्यावर आल्याचेे समजताच राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार या कुटुंबाला यशोधन कार्यालयामार्फत किराणा किट देण्यात आली असून पीडित कुटुंबाला लवकरात लवकर घरकुल मिळावे यासाठी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू असल्याचे इंद्रजीत थोरात यांनी सांगितले. विश्वगुरू शंकराचार्य दशनाम गोस्वामी समाजचे प्रांताध्यक्ष शरद गिरी यांनी संपूर्ण समाज भाऊसाहेब गोसावी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे सांगत समाजाच्या वतीने ही या कुटुंबाला मदत केली जाईल असेे आश्वासन दिले.यावेळी दशरथ गोसावी,भागवत भारती, माधव पुरी,संतोष पुरी ,प्रदीप गोसावी, प्रा.सोमनाथ गोसावी,  रंजीत गिरी, गणेश गोसावी, चंदन गोसावी,प्रवीण गोसावी,लक्ष्मण भारती, निखिल गोसावी,अनिल गोसावी,यमन गोसावी,राजाराम गोसावी,संजय गोसावी,सुदाम गोसावी,लालगिर गोसावी, मच्छिंद्र गोसावी, भानुदास गोसावी, अशोक गोसावी, विशाल गोसावी व गोसावी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here