घरकुलासाठी जागा नसणाऱ्या ४३ लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न साकार – आ. आशुतोष काळे

0

आ. आशुतोष काळेंच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुलाच्या जागेचे उतारे वाटप

कोळपेवाडी वार्ताहर :- ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर असूनही जागेअभावी हे लाभार्थी घरकुलाचा लाभ घेवू शकत नव्हते अशा जिल्ह्यातील एकूण १४३ लाभार्थ्यांना गावठाण जमिनीवरील जागा देण्यात आल्या आहेत. यापैकी ४३ लाभार्थी हे कोपरगाव तालुक्यातील असून हि अतिशय आनंदाची बाब असून या लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न साकार होणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

घरकुल मंजूर मात्र घरकुलासाठी जागा नाही अशा घरकुल पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न साकार व्हावे यासाठी त्या लाभार्थ्यांना गावठाणची जागा द्यावी अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी पंचायत समितीला दिल्या होत्या. त्याबाबत पंचायत समितीने योग्य कार्यवाही करून आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्यातून ४३ लाभार्थ्यांना घरकुलासाठी गावठाण जमिनीवरील जागा मंजूर करण्यात आली. कोपरगाव पंचायत समिती कार्यालयात आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसमवेत विविध विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी या ४३ लाभार्थ्यांना त्यांच्या नावाचे जागेचे उतारे देण्यात आले. त्यावेळी सर्व लाभार्थ्यांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले. यावेळी उपस्थित पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की,

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना फायदा मिळावा यासाठी प्राधान्य द्या. या योजना पोहोचविण्यात दिरंगाई होणार नाही याची काळजी घ्या. ज्या पात्र लाभार्थ्यांना या योजनाचा लाभ मिळणार आहे तो तातडीने कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करा. बांधकाम, आरोग्य, शिक्षण विभाग अशा विविध विभागाकडून दिल्या जाणाऱ्या योजनांची माहिती जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा व घरकुलासाठी ज्यांच्या अडचणी येतील त्या अडचणी दूर करा अशा सूचना दिल्या.

यावेळी कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन दिलीपराव बोरनारे, संचालक सुधाकर रोहोम, अनिल कदम, शिवाजीराव घुले, राहुल रोहमारे, सुनील मांजरे, मनोज माळी, सुरेश जाधव, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, सुधाकर होन,कोकमठाणचे उपसरपंच दीपक रोहोम, गोविंद पगारे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, कृषी अधिकारी पंडित वाघिरे, उपअभियंता चांगदेव लाटे, आरोग्य अधिकारी अधिकारी डॉ. विकास घोलप, पशु संवर्धन अधिकारी डॉ. श्रद्धा काटे, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख तसेच विविध विभागाचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, घरकुल लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

फोटो ओळ- पंचायत समितीच्या आढावा बैठक प्रसंगी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना आ. आशुतोष काळे.

फोटो ओळ- पंचायत समितीच्या आढावा बैठकीत घरकुलासाठी जागा नसणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना जागेचे उतारे वाटप  करतांना आ. आशुतोष काळे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here