डाक विभागाच्या ग्रामीण डाक जीवन विम्यापोटी वारसास धनादेश प्रदान

0

संगमनेर : ग्रामीण टपाल जीवन विमा अंतर्गत मृताच्या वारसांस नुकताच धनादेश प्रदान करण्यात आला.अकोले  तालुक्यातील कुंभेफळ  येथील रहिवासी कै. रोहिदास गवराम पांडे यांनी कुंभेफळ पोस्टात ग्रामीण टपाल जीवन विमा योजने अंतर्गत अडीच लाख रुपयांचा विमा उतरायला होता. दुर्दैवाने काही महिन्यांपूर्वी त्यांचे अकस्मात निधन झाले. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर पोस्ट खात्याने त्यांचा दावा मंजूर करून मयत पांडे यांचे वारसदार यांना ५ लाख २३ हजार सातशे ६३ चा धनादेश श्रीरामपूर डाक विभागाचे अधीक्षक हेमंत खडकेकर यांचे हस्ते प्रदान करण्यात आला .

           यावेळी अकोलेचे पोस्टमास्तर भाऊराव मधे,विमा विकास अधिकारी विजय कोल्हे, सुभान इनामदार , बाळू तातळे, निलेश भवारी, वैभव वाकचौरे विशाल मधे आदी उपस्थित होते. तर या कामी श्रीरामपूरचे पोस्टमास्टर  सागर आढाव ,सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर प्रमुख राजेंद्र गायकवाड ,पुनम गवारे व अकोले पोस्ट मास्तर भाऊराव मधे इत्यादींचे सहकार्य लाभले असे वारसदार म्हणाल्या.

भारतीय डाक विभागाने १९९५ मध्ये खास ग्रामीण भागातील व्यक्तींसाठी ग्रामीण डाक जीवन विमा योजना आणली.सर्वात कमी हफ्ता व सर्वात जास्त बोनस यामुळे ग्रामीण भागात हा विमा लोकप्रिय आहे.ग्राहकाभूमीक सेवांमुळे जनमानसांत टपाल विभागाबद्दल चांगली प्रतिमा आहे.या योजनेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा.

                                           हेमंत खडकेकर

                             डाक अधीक्षक,श्रीरामपूर विभाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here