तुमचं ‘आधार’ सुरक्षित आहे का..?

0

मुंबई, संदिप शिंदे : लहान असो वा मोठा.. स्री असो वा पुरुष.. देशातल्या सर्व वयोगटातल्या नागरिकांसाठी सरकारने ‘आधार कार्ड’ बंधनकारक केलं आहे. बँकिंग असो, शासकीय कामं असाे वा सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असला, तरी ‘आधार कार्ड’ शिवाय पर्याय नाही. अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आधार कार्डची मागणी केली जातेच..

पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, गॅस सिलिंडर, बॅंक खात्यासोबत आधार कार्ड लिंक केलेलं असणं अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यावरुनच या सरकारी प्रमाणपत्राचं महत्व लक्षात येतं.. अलीकडे ‘आधार कार्ड’च्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे.
नागरिकांचे नुकसान टाळण्यासाठी ‘युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथरिटी ऑफ इंडिया’कडून (UIDAI) सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. फसवणूक, तसेच आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ‘आधार कार्ड’बाबतची माहिती अनोळखी लोकांना देऊ नये, असे आवाहन केले आहे…

‘यूआयडीएआय’कडून सल्ला..

लहान असो वा मोठा.. स्री असो वा पुरुष.. देशातल्या सर्व वयोगटातल्या नागरिकांसाठी सरकारने ‘आधार कार्ड’ बंधनकारक केलं आहे. बँकिंग असो, शासकीय कामं असाे वा सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असला, तरी ‘आधार कार्ड’ शिवाय पर्याय नाही. अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आधार कार्डची मागणी केली जातेच..

पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, गॅस सिलिंडर, बॅंक खात्यासोबत आधार कार्ड लिंक केलेलं असणं अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यावरुनच या सरकारी प्रमाणपत्राचं महत्व लक्षात येतं.. अलीकडे ‘आधार कार्ड’च्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे.

नागरिकांचे नुकसान टाळण्यासाठी ‘युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथरिटी ऑफ इंडिया’कडून (UIDAI) सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. फसवणूक, तसेच आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ‘आधार कार्ड’बाबतची माहिती अनोळखी लोकांना देऊ नये, असे आवाहन केले आहे…

‘यूआयडीएआय’कडून सल्ला..

Advertisement

ई-आधार डाउनलोड करण्यासाठी इंटरनेट कॅफे, किऑस्क किंवा अन्य सार्वजनिक कम्प्युटरचा वापर करू नये.
तुमच्याकडे सार्वजनिक काॅम्प्युटर वापरण्याशिवाय अन्य दुसरा पर्याय उपलब्ध नसेल, तर तुम्ही ज्या काॅम्प्युटरवर महत्त्वाच्या कामासाठी ई-आधारकार्ड डाउनलोड केलं आहे, ती फाईल काॅम्प्युटरवर ठेवू नये.
काम संपल्यावर ती फाईल तातडीनं डिलिट करावी. ई-आधार कॉपी डिलीट केल्यानंतर ‘रिसायकल बिन’मधली फाईलही डिलिट करावी. त्यामुळे ‘आधार कार्ड’चा अन्य कोणीही गैरवापर करण्याची शक्यता बाकी राहत नाही.
एखाद्याला 12 अंकी ‘आधार कार्ड’ क्रमांक समजल्यास केवळ त्या क्रमांकाच्या आधारे बॅंक खातं हॅक करू शकत नाही. परंतु, ‘आधार कार्ड’ अधिक सुरक्षित बनवायचं असेल, तर ‘मास्क्ड आधार कार्ड’ तयार करू शकता. ‘मास्क्ड आधार कार्ड’मध्ये 12 अंकांपैकी सुरुवातीचे 8 अंक दिसत नाहीत, तर केवळ शेवटचे 4 अंक दिसतात, असं ‘यूआयडीएआय’नं सांगितलं.. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here