नायब तहसीलदार विनोद गिरी सेवानिवृत्त ; सहकारी अधिकाऱ्यांनी केले कौतुक

0

संगमनेर : संगमनेर तहसील कार्यालयातील निवडणूक नायब तहसीलदार विनोद भागवतगिर गिरी हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती बद्दल त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी त्यांचा सेवापूर्ती गौरव करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

             तालुक्यातील जोर्वे येथील रहिवासी असलेले नायक तहसीलदार विनोद गिरी नुकतेच सेवानिवृत्त झाले. तब्बल तीस वर्षे सहा महिने त्यांनी विविध ठिकाणी विविध पदावर यशस्वीरित्या सेवा केली आहे. यांच्या कार्यकाळात त्यांच्यावर कधीही कुठलाही आरोप झाला नाही. सर्वांना मिळून मिसळून सोबत घेऊन काम करणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. विनोद गिरी यांनी २१ एप्रिल ९२ रोजी महसूल खात्यात कामाला सुरुवात केली. रायगड जिल्ह्यात तलाठी म्हणून त्यांची प्रथम नेमणूक झाली. तेथून २००१ ला संगमनेरला बदली झाली.२००९  संगमनेर येथे सर्कल म्हणून रूजु झाले. २०१६ ला ते नायब तहसीलदार  झाले.२०१६ ते २०१७ जळगाव, २०१७ ते २०२१ अकोले येथे आणि त्यानंतर संगमनेर येथे निवडणूक नायब तहसीलदार म्हणून त्यांनी सेवा दिली. हे  करत असताना नोकरीमध्ये कधीही पैशाचा मोह धरला नाही. जेवढी जनसेवा करता येईल तेवढी केली. महसूलचे काम घेऊन येणाऱ्या गाव खेड्यातील लोकांची प्रामाणिकपणे काम केले. पैशापेक्षा माणसे कमावली.  राज्यात मतदार यादी आधार लिंक मध्ये २१७ संगमनेर विधानसभा मतदारसंघाचा दुसरा नंबर त्यांच्याच कार्यकाळात आला. मतदार यादीत नावे समाविष्ट करणे, कमी करणे, सर्वांशी चांगले बोलणे, त्यांना मार्गदर्शन करणे आदी गोष्टीमुळे श्री.गिरी हे जनतेत आणि महसूलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरले असण्याच्या भावना त्यांचे सहकारी असलेल्या अधिकारी वर्गाने यावेळी व्यक्त केल्या. यावेळी नायब तहसीलदार विनोद गिरी यांना सेवापुर्ती सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, गणेश तळेकर, उमाकांत कडनोर, सेवानिवृत्त नायब तहसीलदार अशोक रंधे, मंडलाधिकारी श्री.ससे, तलाठी प्रशांत हासे, केशव शिरोळे, कल्पना रछोंर, वैभव देशमुख, काळंधे, पाटबंधारे खात्याचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता विजय गिरी, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर शरद गिरी यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here