पंचाग / परीपाठ*

0

❂ दिनांक:~ 24 ऑगस्ट 2022 ❂ *वार ~ बुधवार

आजचे पंचाग

श्रावण. 24 ऑगस्ट
तिथी : कृ. द्वादशी (बुध)
नक्षत्र : पुनर्वसु,
योग :- व्यतिपात
करण : गर
सूर्योदय : 06:04, सूर्यास्त : 06:57,

        सुविचार 

सृष्टी कितीही बदलली तरी,
माणूस पूर्णत: सुखी होत नाही !!
पण दृष्टी बदलली तर
नक्कीच सुखी होतो….

       म्हणी व अर्थ 

लेकी बोले सुने लागे

अर्थ:-
एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलने

          दिनविशेष     

या वर्षातील 236 वा दिवस आहे.

 महत्त्वाच्या घटना 

७९: इटलीतील माउंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक. पॉम्पेई, हर्क्युलेनियम स्टेबी ही शहरे राखेखाली दडपली जाऊन नष्ट.
१६०८: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत ला दाखल.
१८९१: थॉमस अल्वा एडिसनने चलचित्र कॅमेऱ्याचे पेटंट घेतले.
१९६६: रशियन बनावटीचे लूना-११ हे मानवविरहित यान चांद्रमोहिमेवर निघाले
१९६९: भारतीय राजकारणी नेते वी. वी. गिरी यांची भारताच्या राष्ट्रपती पदी निवड करण्यात आली. ते भारताचे चौथे राष्ट्रपती होते.
१९७४: साली श्रीमती इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात कॉंग्रेस नेता फखरुद्दीन अली अहमद यांची भारताच्या पाचव्या राष्ट्रपती पदी नियुक्ती करण्यात आली.
१९९१: युक्रेनने स्वत:ला (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र घोषित केले.
१९९५: मायक्रोसॉफ्टने विंडोज ९५ ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.
१९९८: एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका या जगप्रसिद्ध विश्वकोशाच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली.
२००१: सरोद वादक अमजद अली खान यांना मध्य प्रदेश सरकारचातानसेन पुरस्कार जाहीर.

*जन्मदिवस / जयंती*

१८३३: गुजराथी लेखक समाजसुधारक नर्मदाशंकर दवे ऊर्फ नर्मद यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८८६)
१८७२: केसरी वृत्तपत्राचे संपादक तसेच कायदेमंडळाचे सभासद न. चिं. केळकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९४७)
१८८०: निरक्षर पण प्रतिभावान कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १९५१)
१८८८: स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १९५७)
१८८८: मार्टिन बेकर एरिक कंपनी चे सहसंस्थापक वेलेंटाइन बेकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९४२)
१९०८: क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च १९३१)
१९१७: किराणा घराण्याचे गायक पं. बसवराज राजगुरू यांचा जन्म.
१९२९: यासर अराफत – नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाईनचे नेते (मृत्यू: ११ नोव्हेंबर २००४)
१९३२: रावसाहेब गणपराव जाधव – मराठीतील व्यासंगी साहित्यसमीक्षक. ‘महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा’चे तिसरे अध्यक्ष व ‘मराठी विश्वकोशा’चे प्रमुख संपादक (२००१ – २००३).
१९४५: डब्ल्यू.डब्ल्यू.ई. (WWE) चे सहसंस्थापक विन्स मॅकमेहन यांचा जन्म.
१९४७: पॉलो कोहेलो – ब्राझिलियन लेखक

  *मृत्यू / पुण्यतिथी*

१९२५: सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर – संस्कृत पण्डित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक (जन्म: ६ जुलै १८३७)
१९६७: कैसर शिपयार्ड आणि कैसर एल्युमिनियम चे संस्थापक हेन्री जे. कैसर यांचे निधन. (जन्म: ९ मे १८८२)
१९६८: आधुनिक भारताचे अग्रगण्य विचारवंत आणि सामाजिक वैज्ञानिक, अर्थशास्त्र आणि समाजशास्त्रचे प्राध्यापक तसचं, लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू राधाकमल मुखर्जी यांचे निधन.
१९९३: शतायुषी क्रिकेटमहर्षी प्रा. दिनकर बळवंत तथा दि. ब. देवधर – प्रथमश्रेणीचे ६२ सामने, १०० डाव, ११ वेळा नाबाद, ९ शतके, ३९५१ एकूण धावा, ४४.३९ सरासरी. भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री (१९६५) व पद्मविभूषण (१९९१) या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. (जन्म: १४ जानेवारी १८९२)
२०००: कल्याणजी वीरजी शाह – सुमारे तीन दशके रसिकांवर आपल्या सुरावटीची मोहिनी घालणार्‍या ’कल्याणजी-आनंदजी’ या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू (जन्म: ३० जून १९२८)
२०१८: जॉन मैककेन, जॉन सिडनी मॅककेन तिसरा हा एक अमेरिकन राजकारणी व ॲरिझोना राज्यातून वरिष्ठ सेनेटर.(जन्मतारीख: २९ ऑगस्ट, १९३६)
२०१९: भारताचे केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९५२)

     सामान्य ज्ञान 

मराठी वर्णमालेत पंचमाक्षर म्हणून कोणते वर्ण ओळखले जातात?
ड़,त्र,न.ण म

संगणक संबधित R O M चे संक्षिप्त रूप काय आहे?
रिड ओन्ली मेमरी

आकाशात फेकलेला चेंडू कोणत्या शक्ती मुळे पुन्हा जमिनीवर येऊन आदळतो?
गुरुत्वाकर्षण शक्ती

प्रभु श्रीरामांनी माता सितेला आनन्यासाठी कोणत्या देशात प्रवेश केला होता?
श्रीलंका

उगवत्या सुर्याचा देश कोणता आहे?
जपान

        बोधकथा 

राजा आणि मुंगळा🐜

  *एका जंगलात एक मुंगळा आपल्‍या बिळात राहत होता. एकदा त्‍या देशाचा राजा त्‍या जंगलात शिकार करण्‍यासाठी आला. सा-या मुंग्‍यांचे घर राजाच्‍या सैनिकांच्‍या घोड्यांच्‍या चालण्‍याने उद्ध्‍वस्‍त झाले. त्‍यामुळे मुंग्‍यांची राहण्‍याची समस्‍या निर्माण झाली. त्‍यांची अंडीही नष्‍ट झाली. मुंग्‍यांची लहान पिलेही मेली. आपली जात आणि वंश नष्‍ट झालेला पाहून मुंग्‍यांच्‍या सरदाराला फारच राग आला. त्‍याने राजाचा बदला घेण्‍याचे ठरविले. तो जंगलातून राजाच्‍या महालाकडे निघाले. रस्‍त्‍यात त्‍याला एक अस्‍वल गाठ पडले. त्‍याने मुंगळयाला विचारले,'' कुठे निघाला सरदार?'' मुंगळयाने सर्व हकीकत अस्‍वलाला सांगितली. अस्‍वलाला पण राजाचा राग आला. तो पण मुंगळयाबरोबर निघाला. पुढे जाताना घोडा, हत्ती, उंट, माकड, वाघ, कोल्‍हा, लांडगा, तरस आणि अनेक प्राणी गाठ पडले. त्‍या सर्वांना हा राजाकडून झालेला अत्‍याचार कळाला व ते सर्वच जण मुंगळयाच्‍या सरदारासोबत राजाकडे निघाले. महालाच्‍या दारावर पोहोचल्‍यावर मुंगळ्याने राजाला युद्धासाठी पुकारले. आवाज ऐकून राजाने महालाच्‍या खिडकीतून खाली पाहिले तर तो इतकी मोठी प्राण्‍यांची फौज पाहून राजा घाबरला. त्‍याने कारण जाणून घेतले व आपली चूक मान्‍य केली.* *मुंगळ्याबरोबर त्‍याने तह केला त्‍यात मुंगळ्याच्‍या राहण्‍याच्‍या भागात त्‍याने मनुष्‍यास फिरण्‍यास बंदी केली व मुंगळ्याने राजाला झुकण्‍यास परावृत्त केले.*

तात्पर्य:-
संघटनेत मोठी ताकद असते. सर्वजण एकञ राहील्याने मोठ्यातल्या मोठ्या संकटाचा सामना करता येतो.
सौ. सविता एस देशमुख
उपशिक्षिका पाताळेश्वर माध्य. विद्यालय पाडळी, ता -सिन्नर जिल्हा- नाशिक.
7972808064
श्री. देशमुख. एस. बी*
सचिव
नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ*कार्यवाह – नाशिक जिल्हा T.D.F.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here