परीपाठ/पंचाग/दिनविशेष

0

दिनांक:~ 04 ऑक्टोंबर 2022 ❂*

        *वार ~ मंगळवार* 

       *आजचे पंचाग

 *आश्विन. 04 ऑक्टोबर*

     *तिथी : शु. नवमी (मंगळ)*   

        *नक्षत्र : उत्तराशाढा,*

          *योग :- अतीगंड*

     *करण : कौलव*

*सूर्योदय : 06:25, सूर्यास्त : 06:33,*

  *सुविचार

 *निश्चय पक्का असेल,तर आपण कोणत्याही गोष्टींवर मात करू शकतो.*

           *म्हणी व अर्थ

*खोट्याच्या कपाळी गोटा.*

*अर्थ:- खोटेपणा किंवा वाईट काम करणाऱ्या माणसाचे नुकसान होत असते.*

          *दिनविशेष*     

*जागतिक प्राणी दिन*

*या वर्षातील 277 वा दिवस आहे.*

     *महत्त्वाच्या घटना

*१८२४: मेक्सिकोने नवीन राज्यघटना अंगीकारली आणि ते प्रजासत्ताक बनले.*

*१९२७: गस्टन बोरग्लम याने ’माऊंट रशमोअर’ चे शिल्प कोरण्यास सुरुवात केली.*

*१९३१: इटली देशांत पहिला जागतिक प्राणी दिवस साजरा करण्यात आला.*

*१९४०: ’ब्रेनर पास’ येथे अ‍ॅडॉल्फ हिटलर व बेनिटो मुसोलिनी यांची भेट झाली.*

*१९४३: दुसरे महायुद्ध – अमेरिकेने सॉलोमन बेटे ताब्यात घेतली.*

*१९५७: सोविएत रशियाने ’स्पुटनिक-१’ हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाचा प्रारंभ केला.*

*१९५९: सोविएत रशियाच्या ’ल्युनिक-३’ या अंतराळयानाने चंद्राला प्रदक्षिणा घालून चंद्राच्या पृथ्वीवरुन न दिसणार्‍या भागाची छायाचित्रे घेतली.*

*१९७७: भारताचे परराष्ट्रमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीला हिंदी भाषेत संबोधित केले. हिंदी भाषेत केलं गेलेलं हे पहिलच भाषण होय.*

*१९८३: नेवाडामधील ब्लॅक रॉक डेझर्ट येथे रिचर्ड नोबल याने आपली थ्रस्ट – २ ही गाडी ताशी १०१९ किमी वेगाने चालवून विश्वविक्रम प्रस्थापित केला.*

    *जन्मदिवस / जयंती

*१८२२: रुदरफोर्ड हेस – अमेरिकेचे १९ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १७ जानेवारी १८९३)*

*१८५७: प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्य सेनानी, लेखक व पत्रकार तसचं, लंडनमध्ये इंडियन होम रुल सोसायटी, इंडिया हाउस आणि द इंडियन समाजशास्त्रज्ञांची स्थापना करणारे महान क्रांतिकारक श्यामजी कृष्ण वर्मा यांचा जन्मदिन.*

*१८८४: भारतीय इतिहासकार आणि लेखक रामचंद्र शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९४१)*

*१९१३: सरस्वतीबाई राणे – शास्त्रीय गायिका (मृत्यू: १० आक्टोबर २००६)*

*१९१६: धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला – अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक, सार्वजनिक अर्थकारण व आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अधिकारी व्यक्ती (मृत्यू: ????)*

*१९२८: ऑल्विन टॉफलर – अमेरिकन पत्रकार व लेखक*

*१९३५: अरुण सरनाईक – मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते, तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादक (मृत्यू: २१ जून १९८४)*

*१९३७: जॅकी कॉलिन्स – इंग्लिश लेखिका व अभिनेत्री*

      *मृत्यू / पुण्यतिथी*

*१८४७: महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन. छत्रपती शाहू (दुसरे) यांचे ते थोरले चिरंजीव होत. पेशवाईच्या अस्तानंतर माऊंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी पुन: त्यांना छत्रपतींच्या गादीवर बसवले. पाठशाळा आणि संस्कॄत व मराठीबरोबरच इंग्रजी भाषेच्या अध्यापनाला त्यांनी उत्तेजन दिले. (जन्म: १८ जानेवारी १७९३)*

*१९०४: स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे रचनाकर फ्रेडेरीक ऑगस्टे बर्थॉल्ड यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८३४)*

*१९२१: ’संगीतसूर्य’ केशवराव भोसले – ’संगीत सौभद्र’ मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते. ’हाच मुलाचा बाप’, ’सन्याशाच्या मुलगा’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. त्यांनी स्थापन केलेल्या ललितकलादर्श संगीत नाटक मंडळींतर्फे ’सौभद्र’, ’शारदा’, ’राक्षसी महत्त्वाकांक्षा’ इ. अनेक नाटके रंगभूमीवर आली. (जन्म: ९ ऑगस्ट १८९०)*

*१९४७: मॅक्स प्लँक – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ (जन्म: २३ एप्रिल १८५८)*

*१९६६: अनंत अंतरकर – ‘हंस’, ‘मोहिनी’, ‘नवल’ आणि ‘सत्यकथा’ या मासिकांचे संपादक (जन्म: १ डिसेंबर १९११)*

*१९८२: सोपानदेव चौधरी – कवी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र. ’काव्यकेतकी’, ’अनुपमा’, ’सोपानदेवी’ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. (जन्म: १६ आक्टोबर १९०७)*

*१९८९: ’संगीतभूषण’ पं. राम मराठे – संगीतकार, गायक व नट (जन्म: २३ आक्टोबर १९२४)*

*२०१५: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता एडिडा नागेश्वर राव यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १९३४)*

       *सामान्य ज्ञान

*छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु कोणत्या ठिकाणी झाला ?*

 *रायगड

*संत तुकडोजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला ?*

*ग्रामगीता*

*तलाठयाच्या कार्यालयास काय म्हणतात ?*

*सज्जा*

*राज्यपाल कशाचे प्रमुख असतात ?*

*राज्याचे*

*भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या ?*

*आनंदीबाई जोशी*

        *बोधकथा

     *अति तेथे माती

 *एकदा एक राजहंस एका बगळय़ाला म्हणाला, ‘काय रे, तू आधाशी! पाण्यातला कोणताही प्राणी खायला तू मागे-पुढे पाहात नाहीस.* *बरे-वाईट, नासके-चांगले हा फरकसुद्धा तुला  समजत नाही. माझे पाहा, मी फक्त पूर्ण उमललेल्या कमळातले तंतू तेवढे खाईन, दुसरा कसलाही पदार्थ माझ्या* *घशाखाली जाणार नाही.’ आणि मला तसे आवडणार नाही.* 

*त्यावर बगळा म्हणाला, ‘माझ्या दृष्टीने असा चोखंदळपणा बारकावा असणे बरे नव्हे. ज्यावेळी जे मिळेल ते खावे अन् सुखी राहावे. खाण्याचा पदार्थ दिसला की, तो खावा हेच शहाणपणाचे.’ असे म्हणून बगळा उडाला व जवळच्या तलावाकाठी गेला. तेथे कडेला त्याला  मासा दिसला. तेव्हा विचार न करता त्याने तो एकदम गिळला, पण आत असलेला गळ घशाला लागून तो जिवास मुकला. राजहंस आपले आवडते खाणे खाण्यासाठी दुसर्‍या कमळे असलेल्या तळय़ात गेला, पण तेथे हंस धरण्यासाठी जाळे असल्यामुळे तेथे तो अडकला.*

*तात्पर्यः कोणतीही गोष्ट अति केल्यावर त्याचे परिणाम भोगावे लागते म्हणून कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको.अति तेथे माती होणारच.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*श्री. देशमुख. एस. बी*

*सचिव*

*नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ*

कार्यवाह – नाशिक जिल्हा T.D.F.

सौ. सविता एस देशमुख

*उपशिक्षिका पाताळेश्वर माध्य. विद्यालय पाडळी, ता -सिन्नर जिल्हा- नाशिक.*

*7972808064*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here