परीपाठ/ पंचाग/दिनविशेष

0

दिनांक:~ 8 ऑक्टोंबर 2022 ❂*

       * वार ~ शनिवार *

          * आजचे पंचाग *

    ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

*आश्विन. 08 ऑक्टोबर*

     *तिथी : शु. चतुर्दशी (शनि)*   

        *नक्षत्र : पू. भाद्रपदा,*

          *योग :- वृध्दी*

     *करण : गर*

*सूर्योदय : 06:26, सूर्यास्त : 06:32,*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

           * सुविचार *

     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*सोनं अंगावर घातलं म्हणजे माणूस मौल्यवान होतो असं नाही…तेवढ्या कॅरेटची शुद्धता तुमच्या विचारात असायला हवी.*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

           *⚜म्हणी व अर्थ ⚜*

*ज्याने चोच दिली तो चारा देतोच.*

*अर्थ :- जो जन्माला येतो त्याचे पालन पोषण होतेच.*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

             * दिनविशेष *    

*🌞या वर्षातील🌞 280 वा दिवस आहे.*

    *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*

*१८६०: अमेरिकेतील लॉस एंजिल्स आणि सैनफ्रांसिस्को शहरादरम्यान प्रथम टेलिग्राफ लाईन स्थापित झाली होती.*

*१९३२: ’इंडियन एअर फोर्स अ‍ॅक्ट’ द्वारे भारतीय वायूदलाची स्थापना झाली.*

*१९५९: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने सन्माननीय ‘डी-लिट’ पदवी घरी येऊन दिली.*

*१९६२: नाट्य निकेतन निर्मित, आचार्य अत्रे लिखित व प्रभाकर पणशीकर दिग्दर्शित ’तो मी नव्हेच’ या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्ली येथील आयफॅक्स थिएटर येथे झाला.*

*१९७८: ऑस्ट्रेलियाच्या केन वॉर्बीने पाण्यावर ३१७.६० तशी मैल वेगाचा विक्रम केला.*

*२००१: सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाची (Department of Homeland Security) स्थापना* केली.

*२००५: काश्मीर मध्ये झालेल्या ७.६ रिश्टर भूकंपा मुळे सुमारे ८६,००० – ८७,५०० लोक मृत्युमुखी पडले, ६९,०००- ७२,५०० जण जखमी झाले आणि २.८ दशलक्ष लोक बेघर झाले.*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*१८५०: हेन्‍री लुईस ली चॅटॅलिअर – फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: १७ सप्टेंबर १९३६)*

*१८८९: डेल्टा एअर लाईन्स चे सहसंस्थापक कॉलेट ई. वूल्मन यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९६६)*

*१८९१: शंकरराव वासुदेव किर्लोस्कर – उद्योजक, साहित्यिक व चित्रकार. १९२० मधे त्यांनी किर्लोस्कर छापखान्याची स्थापना केली. त्यातुनच किर्लोस्कर, स्त्री व मनोहर या मासिकांचे संपादन सुरू केले. ’शंवाकिय’ हे त्यांचे आत्मकथन हा उत्कृष्ट आत्मचरित्राचा नमुना आहे. (मृत्यू: १ जानेवारी १९७५)*

*१९२२: गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन – संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ (Biophysicist). वैज्ञानिकांना मिळणारे बहुतेक सर्व राष्ट्रीय सन्मान त्यांना मिळाले. (मृत्यू: ७ एप्रिल २००१ – चेन्नई, तामिळनाडू)*

*१९२४: भारतीय कवि आणि स्कॉलर थिरूनलूर करुणाकरन यांचा जन्म. (मृत्यू: ५ जुलै २००६)*

*१९२६: कुलभूषण पंडित तथा ’राजकुमार’ ऊर्फ ’जानी’ – जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा हिन्दी चित्रपट अभिनेता (मृत्यू: ३ जुलै १९९६)*

*१९३०: भारतीय इंग्रजी दिग्दर्शक आणि निर्माता अलेसदैर मिल्ने यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी २०१३)*

*१९३५: मिल्खा सिंग – ’द फ्लाइंग सिख’*

*१९९३: पशुवैद्यक डॉ. काजल तांबे यांचा जन्म.*

*१९९७: अमेरिकन अभिनेत्री बेला थोर्न यांचा जन्म.*

      *🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*

*१८८८: महादेव मोरेश्वर कुंटे – कवी व संस्कृतचे प्राध्यापक. ’राजा शिवाजी’ हे त्यांचे काव्य विशेष गाजले. (जन्म: १ ऑगस्ट १८३५ – माहुली, सांगली, महाराष्ट्र)*

*१९३६: धनपतराय श्रीवास्तव ऊर्फ ‘मुन्शी प्रेमचंद‘ – हिन्दी साहित्यिक. त्यांनी १५ कादंबर्‍या व ३०० कथा लिहील्या. त्यांचे २४ कथासंग्रह प्रसिद्ध झाले. (जन्म: ३१ जुलै १८८०)*

*१९६७: क्लेमंट अ‍ॅटली – इंग्लंडचे पंतप्रधान (जन्म: ३ जानेवारी १८८३)*

*१९७९: ’लोकनायक’ जयप्रकाश नारायण – स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयी नेते आणि आणीबाणीविरोधी लढ्याचे प्रेरणास्थान (जन्म: ११ आक्टोबर १९०२)*

*१९९६: गोदावरी परुळेकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका. महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील म्हणून त्यांनी सनद मिळवली. तलासरी, डहाणू, शिरगाव या भागातील डोंगरदर्‍यांत फिरून वारल्यांच्या पिळवणुकीचे अनुभव त्यांनी ऐकले व आदिवासींमधे जागृतीचे कार्य केले. ’जेव्हा माणूस जागा होतो’ हे त्यांचे पुस्तक वेगळ्या जगाची ओळख करुन देणारे आहे. (जन्म: १४ ऑगस्ट १९०७)*

*१९९८: इंदिराबाई हळबे ऊर्फ ’मावशी’ – देवरुख येथील ’मातृमंदिर’ संस्थेच्या संस्थापिका, कोकणच्या मदर तेरेसा (जन्म: ? ? ????)*

*२०१२: नवल किशोर शर्मा – केन्द्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल (जन्म: ५ जुलै १९२५)*

*२०१२: वर्षा भोसले – पत्रकार व पार्श्वगायिका (जन्म: ?? १९५६)*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

          *सामान्य ज्ञान *

     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह कोणते आहे ?*

*वडाचे झाड*

* तृतीय रत्न नाटकाचे लेखक कोण आहे ?*

*महात्मा फुले

*तीन राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते ?*

*आंध्रप्रदेश*

*पुलवामा हल्ला केव्हा झाला होता ?*

*१४ फेब्रवारी २०१९*

*पहिले नंबरलेस कार्ड कोणते ?*

*Fam Pay*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

           * बोधकथा *

*🐱बोका आणि कोल्हा🦊*

    एका अरण्यातील झाडाखाली एक बोका व एक कोल्हा बोलत बसले होते. कोल्हा म्हणाला, ‘अरे बोकोबा, कदाचित आपल्यावर जर एखादं संकट आलं तर हजार युक्त्या करून मी त्यातून निभावून जाईन पण तुझं कसं होईल याची मला काळजी वाटते.’ बोका म्हणाला, ‘मित्रा, मला फक्त एकच युक्ती माहीत आहे. तेवढी चुकली तर मात्र माझी काही धडगत नाही. कोल्हा म्हणाला, ‘बाबा रे, तुझी मला फारच काळजी वाटते. अरे, एक दोन युक्त्या मी शिकवल्या असत्या पण आजचा काळ असा आहे की ज्यानं त्यानं आपल्या स्वतःपुरतं पहावं.* *दुसर्‍याच्या उठाठेवी करू नयेत. बरं तर येतो मी. रामराम !’ इतके बोलून कोल्हा निघाला तोच मागून शिकार्‍याची कुत्री धावत आली. बोक्याला झाडावर चढता येत असल्याने तो पटकन् झाडावर चढला. पण कोल्ह्याच्या हजार युक्त्यांपैकी एकही त्याच्या उपयोगी पडली नाही. तो घाबरून थोडसा पुढे पळत नाही तोच शिकारी कुत्र्यांनी त्याला पकडले.

        *तात्पर्य :-

   *एखाद्याला एकच विद्या चांगली येत असेल तर तिच्यामुळे जे काम होईल ते अनेक अपुर्‍या विद्यापासून होणार नाही.*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

     

*श्री. देशमुख. एस. बी*

*सचिव*

*नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ*

*कार्यवाह – नाशिक जिल्हा T.D.F

*सौ. सविता एस देशमुख

*उपशिक्षिका पाताळेश्वर माध्य. विद्यालय पाडळी, ता -सिन्नर जिल्हा- नाशिक.*

*📱7972808064📱*

🚸
🚸
🚸
🚸

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here