*परीपाठ* पंचाग* 

0

*दिनांक:~ 25 ऑगस्ट 2022

        वार ~ *गुरूवार*

*आजचे पंचाग

   *श्रावण. 25 ऑगस्ट* 

     *तिथी : कृ. त्रयोदशी (गुरू)*   

        *नक्षत्र : पुष्य,*

          *योग :- वरियान*

     *करण : विष्टी*

*सूर्योदय : 06:04, सूर्यास्त : 06:56,*

            *सुविचार*      *मैत्री म्हणजे कुंडली न पाहता,* 

*ज्योतिषाला न विचारता,*

*किती गुण जमतात याचा विचार न करता,* 

*साध्य असाध्य न बघता* 

*आजीवन अबाधित राहणारे अतुट बंधन*

           *म्हणी व अर्थ

*गाढ़वाला गुळाची काय चव*

*अर्थ:-*

*ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही, त्याला त्या गोष्टीचे महत्व कळू शकत नाही.*

             *दिनविशेष*    

*या वर्षातील 237 वा दिवस आहे.*

     *महत्त्वाच्या घटना

*१६०९: गॅलिलिओ यांनी जगातील पहिल्या दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.*

*१९१९: जगातील पहिली प्रवासी विमानसेवा लंडन ते पॅरिस सुरू झाली.*

*१९८०: झिम्बाब्वेचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.*

*१९९१: लिनस ट्रोव्हाल्डस याने लिनक्स (Linux) या संगणक प्रणालीची पहिली आवृत्ती प्रकाशित केली.*

*१९९८: एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका या जगप्रसिद्ध विश्वकोशाच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली.*

    *जन्मदिवस / जयंती*

*१९२३: साहित्यिक, समीक्षक अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ यांचा जन्म. (मृत्यू: १५ सप्टेंबर २००८)*

*१९३०: जेम्स बाँडच्या भूमिकांमुळे गाजलेला अभिनेता शॉन कॉनरी यांचा जन्म.*

*१९३६: इमेज इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट चे संस्थापक गिरिधारीलाल केडिया  यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर २००९)*

*१९५२: श्रीलंकेचा क्रिकेटपटू दुलीप मेंडिस यांचा जन्म.*

*१९६२: बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका डॉ. तस्लिमा नसरीन यांचा जन्म.*

      *मृत्यू / पुण्यतिथी*

*१२७०: फ्रान्सचा राजा लुई (नववा) यांचे निधन. (जन्म: २५ एप्रिल १२१४)*

*१८६७: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे यांचे निधन. (जन्म: २२ सप्टेंबर १७९१)*

*१९०८: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच पदार्थवैज्ञानिक हेन्री बेक्वेरेल यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १८५२)*

*२०१२: चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग यांचे निधन. (जन्म: ५ ऑगस्ट १९३०)*

*२०१३: भारतीय गायक-गीतकार रघुनाथ पनिग्राही यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९३२*

          *सामान्य ज्ञान

*हिन्दी दिवस केंव्हा असतो?*

*14 सप्टेंबर*

*श्री परशुराम मंदीर कोणत्या ठिकाणी आहे?*

*चिपळून*

*आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?*

*धुळे , नंदुरबार*

*ज्ञानपीठ पुरस्कार मिळवलेले पहिले महाराष्ट्र निवासी कोण आहे?*

*वि.स.खांडेकर*

*365 दिवस असणाऱ्या वर्षाला काय म्हणतात?*

*सौरवर्ष*

            *बोधकथा

     *उपकाराचे स्मरण ठेवावे

*एकदा एक श्रीमंत माणूस नदीकाठावरील मारूती मंदिरात देवदर्शनासाठी गेला. अचानक त्याच्या मनात आले, नदीत जाऊन हात-पाय धुवावेत व मग मंदिरात देवदर्शनासाठी जावे. तो नदीवर गेला. हात-पाय धूत असताना त्याच्या तोल गेला आणि तो नदीत पडला.* *त्याला पोहता येत नव्हते. त्याची धडपड सुरू झाली. तो ओरडू लागला पण त्याला वाचविण्यासाठी कुणीही पुढे येईना.*

*अखेर एका साधूने नदीत उडी घेतली.* *त्या साधूने त्याला वाचविले. काठावर आणले. काही वेळाने तो श्रीमंत गृहस्थ भानावर आला.* *त्याने खिशातून खूप नोटा बाहेर काढल्या. पण त्यातील फक्त एक रूपयाची नोट साधूच्या हातावर ठेवली. हे पाहून काठावर जमलेले लोक संतापले. चिडून त्यांना थांबविले. त्यांनी त्या व्यापार्‍याला उचलले व नदीत टाकणार इतक्यात साधूने त्यांना थांबविले. साधू म्हणाला, ‘थांबा, त्यांने स्वत:च किंमतीएवढी बक्षिसी दिली. यात त्याची काय चूक? त्याची किंमत एवढीच आहे.’*

*तात्पर्य *

*माणसाची खरी किंमत प्रसंगानेच कळते. उपकारकर्त्याचे उपकार स्मरणे हे माणसाचे पवित्र कर्तव्य आहे.*

 *श्री. देशमुख. एस. बी**

*सचिव*

*नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ*

 *कार्यवाह – नाशिक जिल्हा* *T.D.F* .

सौ. सविता शांताराम देशमुख

*उपशिक्षिका पाताळेश्वर माध्य. विद्यालय पाडळी, ता -सिन्नर जिल्हा- नाशिक.*

 *९०१११८१७१८* 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here