फलटण येथे राष्ट्रीय किशोर व किशोरी खो खो स्पर्धांचे आयोजन.

0

फलटण प्रतिनिधी

                 खो खो फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन तसेच सातारा जिल्हा  हौशी खो-खो संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 32 वी राष्ट्रीय किशोर व किशोरी (14 वर्धाखालील ) स्पर्धांचे आयोजन 29 ऑक्टोबर ते 2  नोव्हेंबर 22 या कालावधीत फलटण  येते करण्यात आलेले आहे ‌. माजी आमदार शिवाजीराजे मालोजीराजे नाईक निंबाळकर क्रीडा संकुलात  आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आहेत. या उद्घाटन प्रसंगी सर्वस्वी आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, शिवेंद्रसिंह राजे भोसले ,दीपकराव चव्हाण,  तसेच अभिमन्यू पवार, भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष, सुधांशू मित्तल  आणि महासचिव महेंद्रसिंग त्यागी उपस्थित राहणार असल्याचे संयोजकांनी कळवले आहे. या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीव राजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष महेश गाडेकर, विजयराव मोरे, तसेच सहसचिव चंद्रजी जाधव, गोविंद शर्मा, आणि फलटण एज्युकेशन सोसायटीचे नियमक मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांची विशेष उपस्थिती आहे.असे युवराज नाईक, सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी आणि महेंद्र गाढवे सचिव सातारा जिल्हा हौशी खो-खो संघटना यांनी कळविले आहे.

                     या स्पर्धेमध्ये विविध  राज्यातील एकूण   60 संघ सहभागी होणार आहेत. सुमारे एक हजार खो खो खेळाडू तसेच त्यांच्याबरोबर प्रशिक्षक आणि व्यवस्थापक उपस्थित असणार आहेत. प्रेक्षकांसाठी प्रेक्षक गॅलरी तयार करण्यात येणार असून स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याची माहिती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here