महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर आणि रायगड भूषण भारतदादा भोपी यांच्या शुभहस्ते झाले आय लव्ह धाकटे भोम नामफलकाचं अनावरण.

0

उरण दि 17(विठ्ठल ममताबादे )गावं तिथे आकर्षक  नावं ! ही संकल्पना उराशी बाळगणारे केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांनी आपल्या स्वतःच्या स्वखर्चाने आज पर्यंत अनेक गावांमध्ये त्या गावांचे आकर्षक अश्या नावांचे नामफलक बनवून दिले.जे रात्री रंगीत विद्युत रोषणाईने चमकून विशेष आकर्षक दिसतात.

<p> उरण तालुक्यातील धाकटे भोम या गावात एक संकल्पना सत्यात उतरविली  गेली. श्री सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ धाकटे भोम  आणि ग्रामस्थांच्यां विनंतीला मान देत राजू मुंबईकर यांच्या माध्यमातून धाकटे भोम गावाच्या नावाचं  आय लव्ह धाकटे भोम हे  नामफलक गावाच्या वेशीवर लावण्यात आले.आपल्या गावाचं नाव गावातल्या प्रत्येक नागरिकाच्यां हृदयात सामावलेलं असतं जो जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी अभिमानाने आपल्या गावाची ओळख सांगायला विसरत नाही !आणि म्हणूनच आपल्या ह्या गावांच्या नावांची ओळख अबाधित राहावी याच उदात्त हेतूने राजू मुंबईकर यांच्या पुढाकारातून धाकटे भोम गावात आय लव्ह  धाकटे भोम नावाच्या नामफलकाचं अनावरण करून त्या नावाचं लोकार्पण करण्यात आले.रिटघर गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते रायगड भूषण भारतदादा भोपी  ( उपाध्यक्ष – आगरी,कोळी,कराडी संघर्ष सा.संस्था),धर्मेंद्र म्हात्रे ( ग्रा.पं.सदस्य चिरनेर- भोम ),गणेश म्हात्रे ( संचालक – शिवधन पतपेढी  चिरनेर ) यांच्या हस्ते ह्या नामफलक अनावरण सोहळ्याचं उद्घाटन करण्यात आले. आणि सोबतच श्री सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ धाकटे भोम यांच्या अयोजनातून विराजमान झालेल्या गणरायाच सर्व मान्यवरांनी मनोभावे दर्शन देखील घेतले.

  <p>रायगड भूषण भारतदादा भोपी ( उपाध्यक्ष – आगरी,कोळी,कराडी संघर्ष सा.संस्था ), अनिल घरत ( उरण तालुका सचिव – आगरी,कोळी,कराडी संघर्ष सा.संस्था),धर्मेंद्र म्हात्रे ( ग्रा.पं.सदस्य चिरनेर- भोम),गणेश म्हात्रे( चेअरमन – शिवधन पतपेढी चिरनेर ), महेश पाटील( कार्याध्यक्ष सिद्धिविनायक गणेशोत्सवमंडळ ) , प्रशांत पाटील ( सामाजिक कार्यकर्ते धाकटे भोम ), झाकीरदादा काकर( सामाजिक कार्यकर्ते रिटघर ), श्री.सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ धाकटे भोमचे सदस्य आणि धाकटे भोम गावातील ग्रामस्थांच्यां उपस्थितीत हा अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here