मुख्याध्यापक संघ,पदवीधर आ.सुधीर तांबे यांची शिक्षण बैठक

0

*नाशिक जिल्ह्याची १३३ कोटीची पुरवणी बिले प्रलंबित*  जिल्हा मुख्याध्यापक संघ आक्रमक

 नाशिक:

नुकतीच शिक्षण उपसंचालक कार्यालयात नाशिक विभागाचे पदवीधर आ.डॉ. सुधीर तांबे साहेब नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ यांची सहविचार सभा शिक्षण उपसंचालक कार्यालयात शिक्षण उपसंचालक डॉ.बी.बी.चव्हाण यांच्या दालनात झाली.

 यावेळी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव   एस.बी.देशमुख यांनी नाशिक जिल्ह्यात चार वर्षापासून शिक्षकांची १३३ कोटीची पुरवणी बिले प्रलंबित आहे.नाशिक पे युनिटने मंजुरीसाठी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे पाठवूनही शिक्षण संचालक या बिलांना मंजुरी देत नाही व शासन या बिलांसाठी परवानगी देत नाही.यामुळे शिक्षकांच्या मुलांचे शिक्षण मुला-मुलींचे लग्न, आई-वडिलांचे आजार पण यासाठी कर्ज काढून आर्थिक नड भागवावी लागते. यामुळे शिक्षक मेटाकुटीला आले आहेत.याबाबत ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे. <p>याबाबत शिक्षकांना योग्य ती माहिती मिळत नसल्याने शिक्षकांचे आर्थिक नियोजन ढासळलेले आहे.जिल्ह्यातील शिक्षकांचे ७ ते ८ कोटी रुपयाचे रजा रोखीकरण बिले, ४ ते ५ कोटी रुपयाचे निवड व वरिष्ठ श्रेणी सह बिले प्रलंबित आहे.यावर ठोस मार्ग काढणे आवश्यक आहे.याबाबत मंगळवार दि.२०/०९/२०२२ रोजी महाराष्ट्रातील शिक्षक व पदवीधर आमदार यांना एकत्र घेऊन मा.शिक्षण मंत्री दिपक केसरकर, मा.वित्त मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक घेऊन हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन नाशिक विभागाचे पदवीधर आ.डॉ.सुधीर तांबे साहेब यांनी मुख्याध्यापक संघाचे सचिव  एस.बी.देशमुख,उपाध्यक्ष प्रदीप सांगळे,संग्राम करंजकर,एन.वाय.पगार व पदाधिका-यांना दिले.

 यावेळी शालार्थ आय डी मान्यता,अनुकंपा तत्वावरील मान्यतेसाठी निघालेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी या कार्यालयाकडून त्वरित केली जाईल.नियमात बसणारी कामे आम्ही त्वरित निकाली* *काढतो.वादांकित प्रश्नांसाठी सुनावणी घेऊन त्वरित निर्णय दिले जातात.शाळांच्या गुणवत्ता तपासणीसाठी वेळ कमी मिळतो यासाठी मागील पेंडीग कामाचा बोजा मोठ्याप्रमाणात वाढलेला असल्याचे डॉ.बी.बी. चव्हाण यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here