रोडरोमिओ आणि गुंड प्रवृत्तीच्या मुलांवर कारवाईसाठी संगमनेरात दामिनी पथकाची स्थापना

0

संगमनेर : संगमनेर मधील शाळा आणि कॉलेज या ठिकाणी रोड रोमिओ आणि रॅगिंग करणारे यांच्यावर वचक निर्माण करण्यासाठी संंगमनेर शहर पोलिसांनी दामिनी पथकाची स्थापना केली आहेे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने तसेच संगमनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार संगमनेरात दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

        या दामिनी पथकाचं काम कॉलेज, शाळा या ठिकाणी ट्रिपल सीट फिरणारे रोड रोमिओ तसेच गुंडगिरी करणाऱ्या मुलांवरती कारवाई करण्यासाठी असणार आहे. दरम्यान मुलींच्या शाळेजवळ या पथकाचे एक अधिकारी आणि दोन पोलीस अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरात मुलींची  छेडछाड तसेच रोड रोमिओनचा त्रास, रॅगिंग असे प्रकार वाढत चाललेत. याला आळा बसावा यासाठी हे पथक काम करणार असुन अनेक शाळा, कॉलेज जवळ अचानकपणे हे पथक जाणार असून रोडरोमिओ वरती  कारवाई केली जाणार आहे. संगमनेर मधील सर्व शाळा आणि कॉलेज यांना या पथकाने भेट देऊन आपले मोबाईल नंबर दिले आहेत. आणि असा गुन्हा घडल्यास त्वरित आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन या पथकाने केले आहे.                                                                                                                               संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले यांनी सांगितले की संगमनेर शहरामध्ये मुलींचे छेडछाड आणि रॅगिंगचे प्रमाण खूप वाढले आहे. शाळा, कॉलेजेस मध्ये किंवा बाहेर अशा ठिकाणी मुलींच्या छेडछाडीचे प्रकार सध्या वाढत आहेत. त्यामुळे शहरात दामिनी पथकाची स्थापना झालेली आहे. या पथकात एक पोलीस अधिकारी, दोन अंमलदार यामध्ये एक महिला अंमलदार अशी नियुक्ती या दामिनी पथकात करण्यात आलेली आहे. सदर पथक शाळा आणि कॉलेजेस येथे कधीही कोणत्याही वेळी भेटी देऊन तिथे जर असे काही प्रकार घडत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम या दामिनी पथकाचे आहे. या पथकाने आतापर्यंत   दहा ते बारा केसेस केलेल्या असून नागरिकांनी तसेच शाळा व कॉलेज प्रशासनाने असे काही प्रकार घडत असेल तर या दामिनी पथकाशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले यांनी केले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here