लय शायनिंग करायची नाही : ठेकेदाराची केंद्र सरकारच्या अधिकाऱ्याला दमबाजी

0

सातारा, स्वामी सदानंद : सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र सरकारचे अन्न विभागाचे मुख्य प्रबंधक बैठकीसाठी आले होते. या बैठकीसाठी सातारा जिल्ह्यातील अन्नपुरवठा ठेकेदार असलेले फिरोज पठाणही उपस्थित होते. बैकठीनंतर अधिकारी आणि सातारा जिल्ह्यातील अन्नपुरवठा ठेकेदार यांच्यात चांगलीच तू तू मैं- मै झाले. या प्रकारामुळे ठेकेदाराची भाईगिरी की अधिकाऱ्याची मजुरी? असा सवाल उपस्थित केला जावू लागला आहे. कारण जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना दमबाजी करणे म्हणजे ठेकेदारांची भाईगिरींमुळे साताऱ्यात अधिकाऱ्यांना कसे काम करावे लागत असेल याचा प्रत्यय आला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक संपल्यानंतर फिरोज पठाण आणि अधिकाऱ्याच्यात शाब्दिक चकमक उडाली. यामध्ये फिरोज पठाण यांनी संबंधित अधिकाऱ्याच्या अंगावर धावून जात होते. ठेकेदारांकडून अधिकाऱ्यावर कारवाईची भाषा करत सुनावले. “मला इथे येऊन शिकवायचे नाही, लय शायनिंग करायची नाही” अशा भाषेत अंगावर धावून जात फिरोज पठाण यांनी अधिकाऱ्याला सुनावले.
             या वादाचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये सर्व प्रकार कैद झाला आहे. यामध्ये अधिकारी आणि नागरिकांनी आ. शिवेंद्रराजे भोसले यांचे निकटवर्तीय असलेले फिरोज पठाण यांना समजावत दुसऱ्या बाजूला घेऊन जाताना दिसत आहेत. यामुळे साताऱ्यातील अधिकाऱ्यांवर ठेकेदारांची दादागिरी, भाईगिरी समोर आली आहे. परंतु या प्रकारावर अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिल्याने नक्की चूक कोणाची, बैठकीत चांगलीच खडाजंगी झाल्याचे दिसून आले. तसेच अधिकाऱ्यांच्या न बोलण्यामुळे अधिकाऱ्यांच्या मुजोरीला उत्तर म्हणायचे की ठेकेदाराची भाईगिरी असा सवाल आता उपस्थित केला जावू लागला आहे. परंतु साताऱ्याच्या ठेकेदारांच्या दबंग भाईगिरीमुळे अधिकाऱ्यांची काम करताना काय अवस्था होत असेल, याचा प्रत्यय व्हिडिअोतून समोर आला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here