वारीत महाश्रमदानातून परिसर स्वच्छता अभियान “सप्ताह ५६ वा” उत्साहात संपन्न!

0

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय वारी, जय बाबाजी भक्त परिवार, वारी व राहुल ( दादा ) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, वारी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. १९ मार्च २०२३) सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत तब्बल ४ तास महाश्रमदान सोहळा व परिसर स्वच्छता अभियानाचा ५६ सप्ताह यशस्वीपणे राबविण्यात आला.
या अभियानात वारी येथील बाजारतळ व पंचशील ध्वज परिसरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता करण्यात आली. यावेळी संकलित केलेला कचरा, प्लास्टिक पिशव्या, काटेरी झुडपा पेटवून दिल्या.
या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे व प्रतिष्ठित व्यापारी मनोहर कृष्णानी, बाजीराव गवारे, विजय वाणी यांनी सदिच्छा भेट देत या अभियानात श्रमदान करून स्वच्छता करून आपला सहभाग नोंदविला व तसेच आमचे काका सामाजिक कार्यकर्ते मधुकरराव टेके पाटील यांच्या संकल्पनेतून बाजारतळ परिसरात आगळ्या वेगळ्या पद्धतीने लावलेल्या २३ वटवृक्षांची पाहणी केली.
या स्वच्छता अभियानात जय बाबाजी भक्त परिवाराचे भाऊसाहेब टेके, स्वच्छतादूत मधुकरराव टेके, ‘लोकमत’चे उपसंपादक रोहित टेके, विलास गाडेकर, रावसाहेब जगताप, ज्ञानेश्वर जाधव, पंडित लकारे, ग्रामपंचायत कर्मचारी रावसाहेब वाघ, उषा बागुल, पोपट बनकर, मच्छिंद्र गागरे यांच्यासह ग्रामस्थांनी स्वच्छतेच्या या अभियानात आपले श्रमरुपी योगदान दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here