विटा-महाबळेश्वर रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला: शाळा व चौकांमध्ये गतिरोधक लावण्याची मागणी

0

पुसेसावळी :

विटा-महाबळेश्वर हा रस्ता जवळपास पूर्णत्वाकडे गेला असुन स्थानिकांना काही दिवसांपर्यंत रस्त्याबद्दल वाटणाऱ्या नवलाईचे रूपांतर आता भीतीत झाले असुन या रस्त्याचे नूतनीकरण झाल्याने अनियंत्रीत वेगाने सुसाट वाहने धावत आहेत. या रस्त्यावर अपघातां मध्ये काही जणांना जीव गमवावा लागला, तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. त्यातच गावामध्ये बांधलेल्या गटारांवरील झाकणे ठिकठिकाणची खाली पडलेली असल्यामुळे गटरवरून जाताना झाकण खाली पडलेले लक्षात न आल्याने   अनेकांना दुखापती झाल्या आहेत.

प्रवाशांचा वेळ इंधन वाचणार या कल्पनेने कधी एकदा रस्ता होतोय,अशी प्रत्येकालाच उत्सुकता होती. त्याप्रमाणे कधी न तो गुळगुळीत रस्ता स्वप्नवत वाटू लागल्याने या मार्गाने ये- जा करणाऱ्या सर्वच वाहनांचा वेग वाढला आहे. त्यामुळे विटा -महाबळेश्वर  रस्त्यावरील गावातील शाळा व चौक येथे कुठेही गतिरोधक नसल्यामुळे अनेकांना आपला जीव  गमवावा लागला आहे.त्यामुळे या रस्त्यावरून सुसाट धावणारी वाहने अनेकांना अक्षरशः मृत्यूला निमंत्रण देत आहेत. या मार्गावर  गतिरोधक नसल्यामुळे वाहनचालक सुसाट वाहने चालवत आहेत.

या रस्त्यावरील चोराडे फाटा, खेराडे वांगी स्टँड, वडगाव हायस्कुल, पुसेसावळीतील दत्त चौक,कोतीज फाटा,घाटमाथा अशा अनेक ठिकाणी चार रस्ते एकत्र मिळतात. त्याठिकाणी विविध कामांसाठी नागरिकांचा वावर नित्याने होतो. दिवसेंदिवस या ठिकाणी वर्दळ वाढत आहे.अशा चौकात गतिरोधक, असायला हवा अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

प्रतिक्रिया:

प्रशासनास जाग कधी येणार

प्रत्येक गावातून मुलामुलीना शाळा. कॉलेजला याच मार्गावरून जावे लागते. मात्र, वाहनधारक याचे भान ठेवत नाहीत. वाहतूकीचे नियम धाब्यावर बसवत सुसाट ये जा करतात. विद्यार्थी तसेच सकाळी वा सायंकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांचा थरकाप उडतो. मार्गावर कोणतीच सोय नसल्यामुळे शासनाने विविध माध्यमांद्वारे वाहनांवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देणाऱ्या फलकांची उभारणी तसेच गर्दीच्या ठिकाणी गतिरोधक करावेत, अशी मागणी गावातील ग्रामस्थांची आहे.

     श्रीकांत पिसाळ,

(माजी ग्रामपंचायत सदस्य)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here