विदेशी पाहुण्यांच्या हस्ते NMGKS संघटनेच्या नामफलकाचे अनावरण.

0

उरण दि १(विठ्ठल ममताबादे )तळागाळातील कामगारांना न्याय देणारे व कामगारांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देणारे कामगार नेते महेंद्र घरत यांनी कामगार क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले स्थान निर्माण केलेले आहे. भारतीय कामगारांचे प्रश्न व समस्या ते नेहमीच आंतरराष्ट्रीय परिषदेच्या व्यासपीठावर मांडत असतात तसेच परदेशातील कामगारांना मिळणाऱ्या सोयी सुविधा भारतातील कामगारांना मिळवून देण्याचे त्यांचे प्रयत्न असतात. त्यामुळेच स्थानिक कामगारांचा ओढा नेहमीच त्यांच्याकडे वाढत आहे. IOTL धुतुम या कंपनीतील कामगारांनी महेंद्रजी घरत यांच्या न्यू मॅरीटाईम ऍण्ड जनरल कामगार संघटनेचे नेतृत्व स्विकारले आहे. संघटनेच्या नामफलकाचे अनावरण दिनांक ३० सप्टेंबर रोजी श्रीलंका, बांग्लादेश, नेपाळ येथील ITF या बहुराष्ट्रीय संघाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आले. तत्पूर्वी ITF प्रतिनिधींनी बाल्मर लॉरी भेंडखळ व पंजाब कॉनवेअर या CFS ना भेट दिली. तसेच न्यू मॅरीटाईम ऍण्ड जनरल कामगार संघटनेच्या पनवेल कार्यालयास भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. भारतातील जवळजवळ ७० संघटना ITF बरोबर संलग्न असतांना ITF प्रतिनिधी नेहमीच न्यू मॅरीटाईम ऍण्ड जनरल कामगार संघटनेला प्राधान्य देतात हि संघटनेसाठी केलेल्या कामाची पोहोचपावती आहे तसेच संघटनेसाठी अभिमानास्पद आहे.  

       

या कार्यक्रमासाठी कामगार नेते महेंद्र घरत, श्रीलंकेचे सुलानी मेंडीस, जयातीसा, बांग्लादेशचे आलम असिकल, अफसर हुसेन चौधरी, नेपाळचे  अजय राय, रुपेश सिकदाल, संजय यादव, राम हरिजन, भाय्याराम प्रसाद, नरेंद्र कार्की, पटनाचे चंद्रप्रकाश सिंग, संगीता गुप्ता, ITF दिल्लीचे गीथा अय्यर, राजेंद्र गिरी, तसेच न्यू मॅरीटाईम ऍण्ड जनरल कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here