समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एकोपा महत्वाचा आहे – ह.भ.प.भरत पाटील

0

सातारा  :  गावामध्ये ऐक्यभाव राखण्यासाठी सर्व समाज घटकांनी एकत्र आले पाहिजे. एकोपा असेल तर प्रलंबित कामे शासनाच्या योजनेतुन पूर्तता करता येईल.तरच समाजाचा सर्वांगीण विकास होईल.असे प्रतिपादन ह.भ.प.भरत पाटील यांनी केले.

                       त्रिपुडी,ता.पाटण येथील अष्टशील विहारात धम्मचक्रप्रवर्तन दिन व वर्षावास सांगता समारोह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.तेव्हा ह.भ.प.पाटील मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे ज्येष्ट मार्गदर्शक सुनिल (आप्पा) वीर होते.यावेळी सरपंच सौ. नंदाताई पाटील,दिलीप देसाई, कृष्णा चव्हाण,सिद्धार्थ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

    ह.भ.प.भरत पाटील म्हणाले, “बाबासाहेबांनी सर्वस्वाचा त्याग करून  समाज परिवर्तन घडविले. संत-महात्म्यांनी दिलेल्या विचारावर वाटचाल केली पाहिजे. सत्कार्य करीत राहिले पाहिजे. ज्ञानाच्या व संविधानाच्या आधारावर नवराष्ट्र निर्माण करण्यासाठी विज्ञानवादी धम्म आचरण करणे काळाची गरज आहे.”

                 बुद्ध,सम्राट अशोक व डॉ. आंबेडकर यांनी धम्मचक्र प्रामुख्याने फिरविले. तदनंतर वेळोवेळी  अनेकांनी धम्मदीक्षा घेतली. त्रिशरण, पंचशील,अष्टांग मार्ग, २२ प्रतिज्ञा आदीचे पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा मनांत व ओठात एकच असले पाहिजे. धम्माचे खरोखर आचरण करीत असाल तर व्यंगात्मक वर्तन असता कामा नये.बाबासाहेबांची बरोबरी कोण्हीच करू शकत नाही. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षावास होत असतो. त्याचे महत्वही अनेकांनी विशद केले.यामध्ये ज्येष्ट बी.डी. तथा भिका (भाऊ) वीर,भागवत वीर,राहुल पी. वीर,लोकजित वीर, सौ.शारदा वीर व अनिल वीर आदींनी आपापली मनोगत अभ्यासपूर्ण व्यक्त केली.संजय (नाना) वीर,सायली वीर,विशाल वीर,चेतन बी.वीर, प्रवीण वीर यांनी स्वागत केले. प्रारंभी,सुमन नांगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महापुरुष यांच्या प्रतिमेस  व पुतळ्यास पुष्पहार अर्पण मान्यवरांनी केला. दिपप्रज्वलन, पुष्पांजली अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले. चंद्रकांत वीर यांनी आभार मानले.सदरच्या कार्यक्रमास अंगणवाडी सेविका सौ.नंदा भोळे,धर्मरक्षित वीर,राहुल ग. वीर,प्रल्हाद वीर,रेखाताई वीर, संतोष वीर, नथुराम वीर,भीमराव वीर, समीर वीर,पुतळाबाई वीर आदी पदाधिकारी,कार्यकर्ते, उपासक – उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थीत होत्या.

फोटो : अभिवादनप्रसंगी ह.भ.प.भरत पाटील,सरपंच सौ.पाटील व मान्यवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here