सातारा हे राष्ट्रभाषेचे तीर्थक्षेत्र आहे : डॉ.दयानंद तिवारी

0

सातारा/अनिल वीर : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. मात्र,अधिकृत असा राष्ट्रभाषेचा  शिक्का मिळायलाच हवा. त्यासाठी केंद्राने ठोस भूमिका घ्यावी. जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे कार्य पाहता हिंदीचे तीर्थक्षेत्र असल्याचे मनोमन वाटत आहे. असे गौरवोद्गार राजस्थान विद्यापीठाचे हिंदी विभागाध्यक्ष डॉ. दयानंद तिवारी यांनी काढले.

     जिल्हा हिंदी अध्यापक मंडळ, महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळ व महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय एक दिवसीय हिंदी संगोष्ठी येथील राष्ट्र्रभाषा भवनात आयोजित करण्यात आली होती.तेव्हा डॉ.तिवारी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करीत होते.ते पुढे म्हणाले, “हिन्दी संस्कृती शिकवते.”सर्वजण हिंदी जाणतात.तीच खरी संस्कार देत असते.संपूर्ण राष्ट्रास ज्ञात आहे. साताऱ्यात विजेचा कडकडाटही थांबण्याची क्षमता आहे. भारतात २२ भाषा आहेत. ७६ टक्के लोक हिंदी बोलतात. विश्वविद्यालय दीडशे आहेत.हिंदी गंगाजल आहे.इंग्रजीत १० हजार शब्द तर हिंदीत अडीच लाख शब्द आहेत. हिंदीमुळे कामे होत असतात. स्वातंत्र्यासाठीही हिंदीचा उपयोग झाला.” अशाप्रकारे डॉ.तिवारी यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले.

    डॉ. गजानन भोसले म्हणाले, "रोजी-रोटी हिंदी ही विश्वभाषा आहे.राष्ट्राची सौभाग्याची भाषा आहे.व्यापारी भाषा असल्याने इतर भाषा यांचा समावेश वाक्य, शब्द आदींचा झाला तर व्यापकता येईल."

    महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी म्हणाले,”देशाचा प्राणवायू हिंदी आहे.राज्यस्तरावर महामंडळाचे काम उत्कृष्ट आहे. त्यामध्ये सातारा जिल्हा अग्रेसर असतो.राष्ट्रभाषेसाठी पंतप्रधान ना.नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविले आहे.हिंदीस समान दर्जा मिळण्यासाठी आम्ही आग्रही असतो.पूर्वीचे आंदोलनही यशस्वीपणे पार पाडली आहेत.”

   “मराठी-हिंदी की वर्तनी में अंतर एवं समदर्शिता, विश्वभाषा हिंदी राष्ट्रभाषा बने तो ऐसे  व रोजगारपरक हिंदी या विषयांवर  डॉ. शोभा पाटील यांनी स्लाईड-शोच्या माध्यमातून स्पष्टीकरण केले.सुषमा माने आदींनी आलेख वाचन केले. येथील कला वाणिज्य महाविद्यालयाच्या हिंदी विभागाध्यक्ष डॉ. सुवर्णा यादव यांनी अभ्यासपूर्ण असे मार्गदर्शन केले. यावेळी प्राथमिक जिल्हा शिक्षणाधिकारी शबनम मुजावर , हिंदी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष अभिलाष अवस्थी व डॉ. सिराज शेख (कोरेगाव) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी मान्यवरांचा गौरव व कोरोना योध्दा म्हणून शिक्षण क्षेत्रात गौरवशाली योगदान देणाऱ्या हिंदी शिक्षकांचा गौरव करण्यात आला.सदरच्या संगोष्ठीला राज्यभरातून २६० मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते. जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष ता.का.सूर्यवंशी यांनी स्वागत करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सुधाकर माने यांनी प्रास्ताविक केले. विजयकुमार पिसाळ,संजय शिंदे,विनायक बगाडे,सौ.उज्वला मोरे व गोरख रुपनवर यांनी सूत्रसंचालन केले.महाळाप्पा शिंदे यांनी आभार मानले.सदरच्या कार्यक्रमास शाहनवाज मुजावर, अ.तु. पाटील,संजय गावडे (कोल्हापूर), राजेश टागोर,दीपक सूर्यवंशी,अनंत यादव,रवींद्र बागडी, रामानंद पुजारी, पंडित माने(सिंधुदुर्ग), प्रज्ञा एडके, प्रशांत चोरगे,इकबाल मुल्ला,शिवाजीराव खामकर, राजाराम तपळे (नगर), शिवाजीराव कोकाटे,  पिलगर (नाशिक)श्रीकांत लावंड,श्री.व सौ.शिवदास, डूबल आदी कार्यकारिणी सदस्य,सर्व विभागीय पदाधिकारी,कर्मचारी, जिल्ह्यातील अध्यापक – अध्यापिका मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.

फोटो : डॉ.दयानंद तिवारी मार्गदर्शन करताना शेजारी मान्यवर.(छाया-अनिल वीर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here