*सामाजिक न्याय विभागाचा  वर्धापन दिन  उत्साहात साजरा , येवला*

0

येवला प्रतिनिधी :

मागासवर्गीय मुलांचे शासकिय वसतिगृह बाभुळगाव , ता. येवला येथे दि.१५ऑक्टोबर २०२२रोजी  सामाजिक न्याय विभागाचा ९०वा वर्धापन दिन उत्साहात साजरा  करण्यात आला ,  यावेळी विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून येवला ग्रामीण पोलिस निरीक्षक  श्री अनिल भवारी उपस्थीत होते. यावेळी 

त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा विद्यार्थ्यानी अभ्यास करणे ही काळाची गरज असून , अभ्यास हेच अंतिम यश तुम्हाला मिळवून देईल , कारण या अभ्यासातून मिळणारा प्रेरणेचा स्रोत तुम्हा सर्वांनाच धैयाची नवी उंची गाठवण्यासाठी दिशादर्शक ठरणार असल्याचे सांगितले आणि विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षा देत असताना सतत आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न करा असे प्रतिपादन भवारी यांनी केले.

 सायबर क्राईम/गुन्हे थांबवणे या विषयी सुद्धा त्यांनीं विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले , या विषयाच्या माध्यमातून  त्यांनी विद्यार्थ्यांना आपला सर्वांगीण व्यक्तिमहत्व विकास करुन या भारताचा सुजाण नागरिक बना असा मोलाचा संदेश दिला .

तसेच पोलिसांना सायबर क्राईम संदर्भात अधिक माहिती उपस्थितांनी दिली.

यावेळी शासकिय वसतिगृह अधिक्षक श्री ज्ञानेश्वर लोखंडे , पोलिस कॉन्स्टेबल श्री. पिसाळ दादा , श्री. गडाक दादा तसेच शासकिय वसतिगृह इतर कर्मचारी आदी उपस्थीत होते.  या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसतिगृह विद्यार्थि प्रतिनिधी – ऋषिकेश बछाव याने केले.

 यावेळी  वसतिगृहातील विद्यार्थी – कुणाल गायकवाड , क्षीतिज घुसाळे , ऋषिकेश बाच्छाव , करण निरभवणे , सिध्दार्थ गंगवणे , मयूर देनक ,  रोहित भगत , झुंबर पोटे , संतोष घुगे , सम्राट घुसाळे , अजय विरादे आदी उपस्थीत होते. वसतिगृह अधिक्षक लोखंडे सर यांनी कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणुन आलेल्यांचे आभार मानले. 

आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here