७५ कोटीची शिक्षकांची फरक बीले पुण्यातुन मंजुर ,मुख्याध्यापक संघाच्या पाठपुराव्यास यश 

0

नाशिक – नुकतीच शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे येथे शिक्षण संचालक कृष्णकांत पाटील यांच्या सोबत महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात शिक्षकांची फरक बीले, मेडीकल बीले , रजा रोखीकरण, आँनलाईन पेन्शन केसला मंजुरी देणे .१० , २० , ३० चा टप्पा शाळा कर्मचाऱ्यांना लागु करावा . अपात्र शाळांना २० % अनुदानास  पात्र करावे हया विषयांवर चर्चा झाली , ७५ कोटीच्या फरक बीलांना तत्वतः मंजुरी दिली . मात्र १८ कोटीची मेडीकल बीले , ४५ कोटीची फरक बीले, ०८ कोटीची रजा रोखीकरण बीले मात्र आजही पडून आहेत ती त्वरित अदा करा . महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाची शिक्षण संचालकांकडे मागणी .

        कोविड काळापासुन मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची  फरक बीले  बाकी आहे. शिक्षण विभागाचे आश्वासनावर आश्वासने देण्याचे काम चालू आहे शिक्षक कर्ज काढून मुला / मुलींचे लग्न करतात , स्वतःचे व आई वडिलांचे आजारपण काढतात , मुला ,मुलींचे  शिक्षणं करतात. आशा एवढीच कि आमचे फरक बीले, मेडीकल बीले येतील आणि आमच्या डोक्यावरील कर्जाचा भार कमी होईल , यासाठी शिक्षणाधिकारी , शिक्षण उपसंचालक , पे युनिट अधिक्षक , मुख्याध्यापक संघटनेचे पदाधिकारी , शिक्षक व पदवीधर  आमदार यांच्या विनवण्या करतात पण आश्वासनाशिवाय काहीच पदरात पडत नाही. यामुळे संघटनेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांवरचा विश्वास शिक्षकांचा कमी होत चालला आहे. याला सर्वस्वी जबाबदार शिक्षण विभाग व वित्त विभाग आहे . राज्यात नाशिकचा विचार केला तर ४५ कोटीची फरक बीले ,०८ कोटीचे रजा रोखीकरण व १८ कोटीची मेडीकल बीले सध्या निधीअभावी पडून आहेत , ४५ कोटीची फरक बीले शिक्षण उपसंचालक कार्यालयात पडून आहे. निधी नाही म्हणुन ही बीले मंजुरीसाठी शिक्षण संचालक कार्यालयात मागविलीच जात नाही ही शोकांतिका आहे . शालार्थ आय.डी.च्या फरकाच्या रकमा २०१४-१५ पासुन लाखो रुपये शिक्षकांचे मिळेनासे झाले आहे . शिक्षक फक्त आशावादी आहे . आमचे हक्काचे पैसे आम्हाला वेळेवर मिळत नसेल तर आम्ही विश्वास कोणावर ठेवायचा अशी रखड मागणी मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे अध्यक्ष केरूभाऊ ढोमसे , सचिव एस.बी. देशमुख, व्ही.पी. सोनवणे , बी .बी. भागवत , एस .टी. वाघमोडे , एस .सी. सुतार , पी .एस. सांगळे ,कदम सर यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक कृष्णकांत पाटील सहसंचालक हारूण अत्तार यांच्याकडे केली आहे .आम्हाला रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू नका असा इशाराही नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस.बी. देशमुख यांनी दिला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here