महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जातीच्या राज्यस्तरीय दोन दिवशीय शिबिराला शिर्डीत सुरुवात
शिर्डी -भाजप सरकार सत्तेत आल्या पासून सतत घटना विरोधी कृत्य करत आहे. भारतीय संविधानाने आपल्याला लोकशाही मूल्य दिलेली असतांना मानवी मूल्य तुडविली जात आहेत, स्वातंत्र्यचा गळा घोटण्याचं काम इथे होतं आहे याचे मोठे उदाहरणं म्हणजे मणिपूरमध्ये चालू असलेला नर संहार.
आज मणिपूर वर लोकशाही चे मंदिर असलेल्या पार्लमेंट मध्ये मणिपूर विषयावर बोलू दिलं जात नाही.350 हुन अधिक चर्च मणिपूर जाळलंय तसेच 2-3 मंदिर उध्वस्त केली गेली मात्र, त्यावर अजूनही प्रधानमंत्री मोदी यांनी त्यावर तोडगा काढला नाही. एकप्रकारे हा देश धोक्यात आला आहे असे सांगून मुकुल वासनिक यांनी भारतीय घटना शाबूत ठेवण्या साठी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत लढा चालूच ठेवेल संपूर्ण भारतीयांनी काँग्रेस विचार धारा जोपसावी असे आवाहन करत भारतीय घटना तयार करतांना मसुदा समितीच्या झालेल्या सभा, त्यांचे अध्यक्ष व तारखाचा अभ्यासपूर्ण उल्लेख केला. संविधान कि राह पर या राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन करून आयोजक सिद्धार्थ हत्तीअभीरे यांनी आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली प्रत्येक ठिकाणी असा कार्यकर्ता तयार व्हावा अशीच अपेक्षा खा. वासनिक यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुशांच्या प्रतिमांचे पूजन करून झाली.