कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव  व सभापती  यांची बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट

0

प्रतिनिधी कळंब(किशोर तौर )

कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव पुष्पदत्त वाघ साहेब व सभापती शिवाजी(आप्पा) कापसे यांनी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली,याप्रसंगी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड.रणवीर राजेंद्र राऊत यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला.

  कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत हे गेल्या पाच वर्षांपासून उत्तमरित्या कारभार पाहत असुन बाजार समितीची प्रशासकीय इमारत सुंदर व सुसज्ज आहे,येथे शेतकऱ्यांसाठी व व्यापाऱ्यांसाठी बाजार समिती विविध योजना राबवत आहे,अशी सर्व सोयी सुविधांनी युक्त बाजार समिती पाहुन कळंब बाजार समिती येथे अशा पद्धतीचे नियोजन व्हावे असा संचालक मंडळाचा प्रयत्न राहील असे कळंब बाजार समितीचे नुतन सभापती शिवाजी(आप्पा)कापसे यांनी सांगितले.

   यावेळी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे मालक,चंद्रकांत मांजरे,सचिव तुकाराम जगदाळे,ज्येष्ठ नेते बाबासाहेब मोरे,माजी सभापती केशव घोगरे,व्यापारी सचिन मडके, कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कोल्हे नाना, सचिव वाघ साहेब  तसेच इतर प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here