शिक्षकाना त्यांच्या हक्काचे पैसे मिळेना ; नाशिक जिल्ह्यातील शिक्षक आले मेटाकुटीला

0

सिन्नर : महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांना निवेदन गेल्या सात वर्षांपासूनची ६४ कोटीची बीले मंजुर होऊन निधी अभावी पडून आहे.३२ कोटीची बीले शिक्षण उपसंचालक यांच्या चौकशीत अडकली आहे.तर २६ कोटी रु.ची रजा रोखीकरणाची बीले ट्रेझरी मध्ये अडकली आहे. ही बीले गेल्या महिन्यापासुन ट्रेझरीत का पडून आहे याचे कारणही कळेना. त्यामुळे पाठ- पुरावाही करता येईना.यात शिक्षक पुर्णपणे भरडले गेले आहेत. यात शिक्षकांचा दोष काय?
नुकतेच नवनिर्वाचित शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांच्यासोबत महाराष्टू राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाची बैठक पुणे येथे पार पडली.यात प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांची फरक बीले निघाली नाही.कोवीड काळापासुन अजुनही अडकलेली ही बीले आहेत.कोवीड काळात आमच्या शिक्षकांचे कुणाचे आई /वडील/नातेवाईक दगावले हे दुःख आहेच त्यात काहींच्या मुला/मुलींचे लग्न शिक्षण, आई/वडीलांचे आजारपण हे सर्व फरक बिलांवर अवलंबून असतांना फरक बील मात्र निघत नाही.पाठपुरावा करूनही आश्वासने दिली जातात.मात्र मे महिना अखेर ही बीले मिळाली नाही तर सर्व संघटना एकत्र येऊन शिक्षण संचालक कार्यालयासमोर आंदोलन करतील असा इशारा प.महाराष्टू राज्याचे सचिव एस.बी.देशमुख यांनी दिला.
यावेळी २०/४०/६०/८० टक्के शिक्षकांचे फरक बील, पगार वेळेवर व्हावे.सेवा निवृत्त मुख्याध्यापक/शिक्षक यांचे सेवानिवृत्तीचे लाभ सेवानिवृत्तीच्या दिवशीच त्यांना मिळावे,जुनी पेन्शन योजना लागु करावी, सेवाजेष्ठता यादी अद्यावत करावी हे विषय झाले याला शिक्षण संचालक संपत सुर्यवंशी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी एस.बी.देशमुख,माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, दत्तात्रय कदम, राजेंद्र सुर्यवंशी, रविंद्र काकड, शिवाजी पाटील, एम.एन.पाटील हे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here