बुलडाणा,(प्रतिनिधी- सालाबाद प्रमाणे या वर्षीही मराठा सेवामंडळ अकोला व्दारा ४३ उपवर-वधू व पालक परिचय मेळावा २९ डिसेंबर २०२४ रोजी रोज रविवारला सकाळी १० वाजता मराठा मंगल कार्यालय रामदास पेठ पोलीसस्टेशनच्या बाजूला जिल्हा अकोला येथे आयोजन करण्यात आला आहे.
४३ वर्षापासुन समाजातील सुसंवाद व एकोपा निर्मिती साठी समाजासाठी योगदान देणाऱ्यांचा सत्कार करून पुरस्कार देण्यात येतो व त्याच्या कार्याला शुभेच्छा देण्यात येतात. तर यावेळेचा समाजभुषण पुरस्कार मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातील कामगार नेते कामगार सेनेचे राज्यसरचिटणीस मराठा सेवामंडळाचे सचिव तथा मराठा महासंघाचे उपाध्यक्ष असलेले गजानन माने यांच्या सामाजीक, व्यवासायिक तसेच विविध श्रेत्रातील प्रगतीचा व योगदानाचा व त्यांच्या कार्याचा गौरव व्हा यासाठी त्यांना यावर्षी २०२४ चा समाजभूषण पुरस्कार जाहीर केला आहे व त्यांना या २९ डिसेंबरच्या वधूवर परिचय मेळ्यात देण्यात येणार आहे.
मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातून गजानन माने यांना हा समाजभूषण पुरस्कार मिळाल्या बद्दल सामाजीक राजकीय स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या चाहात्यांनी व बुलडाणा जिल्ह्यातून तसेच बुलडाणा मराठा सेवा मंडळाच्या कार्यकर्यांनी पदाधिकाऱ्यांनी फटाके फोटून पेढे वाटून त्यांचे आनंद व्यक्त केला व मराठा सेवा वधूवर परिचय समितीचे धन्यवाद मानले. पत्रकार बाबासाहेब जाधव यांनी माने त्यांच्या आजपर्यंत केल्या कार्यास व समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल भावी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.