
माहूर : माहूर पंचायत समिती येथे ‘जल जिवन मिशन’ जिल्हा परिषद नांदेडच्या वतीने “फिल्ड टेस्ट किट” वापरा बाबतचे प्रशिक्षण शिबीर बुधवारी (दिनांक 25 जानेवारी) संपन्न झाले.कर्मचा-यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात पाणी तपासून अहवाल सादर करण्याचे आदेश यावेळी कर्मचा-यांना देण्यात आले..
आज दि. २५ जानेवारी रोजी माहूर पंचायत समितीच्या कै.वसंतरावजी नाईक सभागृहात माहूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश कांबळे तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष पवार यांच्या उपस्थितीत जल जीवन मिशन जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत पंचायत समिती माहूरच्या वतीने तालुक्यातील आशा वर्कर, जलसुरक्षक तसेच सर्व आरोग्य कर्मचारी यांना एफ.टी.किट (Field test kit) वापराबाबत प्रोजेक्टर मार्फत प्रशिक्षण घेण्यात आले. तसेच उपस्थितांना मान्यवरांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले. दरम्यान कर्मचा-यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात पाणी तपासणी करून तातडीने तसा अहवाल कार्यालयास देण्याविषयी उपस्थित कर्मचाऱ्यांना आदेशित करण्यात आले.
यावेळी माहूर पंचायत विस्तार अधिकारी प्रदीप मुरादे, आरोग्य विस्तार अधिकारी एस. एम.जाधव, आर. एस. गावंडे, तालुका आरोग्य सहाय्यक एस.आर.जोगपेठे, गट समन्वयक बी.ए.गोवंदे, तालुका समूह संघटक श्रीमती दिपिका तिरमनवार, कुष्ठरोग तंत्रज्ञ श्रीमती ऋतुजा जगताप यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.