साप शिडी../गद्दार ..

0
32

साप शिडी..

बालपणी  सापशिडी

मजा वेगळी  हरघडी

मित्रा  संगे  खेळ रंगे

कधी तरी चिडाचिडी

दान पडे उलटसुलटे

मना मध्ये  धड धडी

मिळता  कधी  शिडी

उत्साहाने  मारी उडी

ऐनवेळी  साप  गिळे

तरी   उमेदिनी  खेळे

दान  टाके पुढे  चाले

म्हणूनि  आनंद मिळे

संपले   ते   बालपण

खेळ  चालू असे पण

खेळतो  तो  विधाता

खेळणे झालो आपण

कधीतरी शिडी  मिळे

साप जागोजाग गिळे

मनासारखे नाही दान

तरीसुद्धा  सारे  खेळे

 

 

गद्दार ..

विश्वासू रखवालदार

ज्यावर  सारी  मदार

ढासळे अभेद्यकिला

आतून उघडता दार

दिमतीला सज्जसर्व 

हजारो  शूर  सरदार  

फितूर शाप विश्वासा

होती  सारे असरदार

पुढे सरकता जोमाने

घ्यावया लावे माघार

शत्रूच्या ताकदीपेक्षा

फक्त पुरे  एक गद्दार

बाजार  बुणग्यांनीचं

फुलतो जिथे बाजार

अस्तनीत लपे  साप

आपला करी  बेजार

छातीवर झेलले वार

जिंकलो अनेक  वार

पाठी  घुसता खंजीर

सहज पत्करली  हार

– हेमंत मुसरीफ पुणे. 

  9730306996.

www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here