पागोटे येथे महारक्तदान, आरोग्यशिबीर, नेत्रदान शिबीर व अन्नदानाचे आयोजन.

0

उरण दि 31(विठ्ठल ममताबादे) माजी आमदार तथा शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था पागोटेच्या माध्यमातून गुरुवार दि 1 जून 2023 रोजी कुंडेगाव, पागोटे नाका,पंप हाउस,कुंडेगाव जवळ उरण येथे सकाळी 10 ते 2 या वेळेत महारक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी शिबीर व अन्नदानाचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी, जनतेने या आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा व इच्छुक रक्तदात्यांनी जास्तीत रक्तदान करावे असे आवाहन कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था पागोटे मार्फत करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here