ब्रिटनचा पराभव करत भारताचा ऑलिंपिक हॉकीच्या उपांत्य फेरीत प्रवेश

0

पॅरिस :पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताच्या पुरुष हॉकी टीमनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अत्यंत चुरशीच्या लढतीत भारतानं इंग्लंडवर शूटआऊटमध्ये 4-2 अशी मात केली. या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात 17 व्या मिनिटाला भारताच्या अमित रोहिदासला मैदानाबाहेर जावं लागलं. उरलेल्या सामन्यात भारतीय संघ दहा खेळाडूंनिशीच खेळला. मग हाफ टाईमपर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक गोल केले होते आणि निर्धारीत वेळेच्या अखेरीस दोन्ही टीम्स बरोबरीत होत्या. मग पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतानं 4-2 असा विजय साजरा केला.

बॅडमिंटनमध्ये भारताच्या लक्ष्य सेनला पराभव स्वीकारावा लागला. डेन्मार्कचा दिग्गज बॅडमिंटनपटू व्हिक्टर अ‍ॅक्ससननं लक्ष्यला 20-22, 14-21 असं सरळ गेम्समध्ये हरवलं. पण लक्ष्यला अजूनही पदकाची संधी आहे. तो आता कांस्यपदकासाठीच्या लढतीत सहभागी होईल बॉक्सिंग रिंगमध्ये लव्हलिना बोर्गोहाईंलापराभव स्वीकारावा लागला. चीनच्या ली चिआननं तिला गुणांच्या आधारे हरवलं.

मनू भाकर चौथ्या स्थानावर

भारताची नेमबाज मनू भाकरचं एकाच ऑलिंपिकमध्ये पदकांची हॅटट्रिक साजरी करण्याचं स्वप्न थोडक्यात भंगलं. तर बॉक्सर निशांत देवला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.

मनू आज पॅरिस ऑलिंपिकमध्ये 25 मीटर पिस्टल प्रकारात फायनलमध्ये खेळली.

मनूनं यंदा याआधी 10 मीटर एयर पिस्टल नेमबाजीमध्ये मनूनं वैयक्तिक आणि मिश्र सांघिक अशी दोन पदकं कमावली आहेत. एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदकं जिंकणारी ती स्वतंत्र भारतातील पहिलीच खेळाडू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here