IPL 2025 : भारताचा स्टार क्रिकेटर शुभमन गिल (Shubman Gill) आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा मागील काही वर्षांपासून सुरु आहेत. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले. मात्र दोघांनी आतापर्यंत त्यांच्या नात्याविषयी कोणत्याच प्रकारची वाच्यता केली नव्हती. सारा तेंडुलकर ही शुभमन गिलची बहीण शाहनील गिल हिची सुद्धा खूप चांगली मैत्रीण आहे. मात्र आता शुभमन आणि सारा या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचे बोलले जातं आहे.
सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल हे दोघे सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह असतात. सारा ही तिचे मॉडेलिंग फोटोशूट, सामाजिक काम, ट्रॅव्हलिंग इत्यादी प्रकारचा कॉन्टेन्ट सोशल मीडियावर शेअर करत असते. तर शुभमन गिल सुद्धा क्रिकेट आणि दैनंदिन आयुष्याविषयी विविध गोष्टी सोशल मीडियावर फॅन्स सोबत शेअर करतो. मात्र मीडिया रिपोर्टसमध्ये दावा करण्यात आला आहे की, काही दिवसांपूर्वीच सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल या दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलं आहे. सारा आणि शुभमन हे दोघे एकमेकांना पूर्वी इंस्टाग्रामवर फॉलो करायचे. मात्र आता दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलंय.
हेही वाचा : 17 वर्षांच्या मराठमोळ्या क्रिकेटरचं CSK कडून IPL मध्ये पदार्पण, कोण आहे आयुष म्हात्रे?
टीव्ही अभिनेत्रीशी जवळीक वाढल्याने नात्यात दुरावा?
क्रिकेटर शुभमन गिल आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अवनीत कौर या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुद्धा रंगल्या. अवनीत कौर आणि शुभमन गिल यांची जवळीक सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या नात्यात दुराव्याचे कारण ठरली अशी चर्चा आहे. मात्र यामुळे दोघांचे फॅन्स नाराज झाले असून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.