Gulshan Kumar Birth Anniversary : ‘खूप पुजा केली आता…’; 16 गोळ्या अन्… जाणून घ्या का झाली गुलशन कुमार यांची हत्या? – Pressalert

0


Gulshan Kumar Birth Anniversary : आज आपण अशा व्यक्तीविषयी जाणून घेणार आहोत. ज्यानं दिल्लीतल्या दरीयागंज भागात ज्युसचं दुकान सुरू केलं. पण पुढे त्यांनी म्युझिकच्या क्षेत्रात एन्ट्री केली आणि संपूर्ण म्युझिक इंडस्ट्रीचं चित्रच बदलून टाकलं. तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपण कोणाविषयी बोलतोय. ते म्हणजे ‘कॅसेट किंग’ गुलशन कुमार. आज 5 मे रोजी त्यांचा जन्मदिन आहे. आज त्यांच्या विषयी आपण काही खास गोष्टी जाणून घेऊया…

5 मे 1951 रोजी दिल्लीतील मध्यमवर्गीय पंजाबी कुटुंबात गुलशन कुमार यांचा जन्म झाला. त्यांचे वडील चंद्रभान यांचं दरीयागंजमध्ये ज्युसचं छोटं दुकान होतं. गुलशन कुमारसुद्धा वडिलांच्या दुकानात काम करत होते, पण थोड्याच काळात त्यांना त्या सगळ्याचा कंटाळ येऊ लागला. त्यानंतर त्यांनी एक छोटं दुकान घेतलं आणि तिथे ते गाण्याचे रेकॉर्ड केलेले कॅसेट्स हे अवघ्या 7 रुपयांमधअये विकू लागले. तिथुनचं त्यांनी ‘सुपर कॅसेट्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ या कंपनीची सुरुवात केली आणि ती देशातील सगळ्यात मोठी म्यूझिक कंपनी झाली. या कंपनीच्या नावा खालीच ‘टी-सीरिज’ची स्थापना झाली, ज्यात ‘टी’ म्हणजे ‘त्रिशूल’ होतं. व्यवसाय वाढतोय हे पाहता गुलशन यांनी मुंबईला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. 

‘कॅसेट किंग’ कसे झाले?

टी-सीरिजची स्थापना 11 जुलै 1983 रोजी झाली. त्यांना पहिला मोठा ब्रेक मिळाला 1988 साली ‘कयामत से कयामत तक’ चित्रपटामुळे मिळाला. या चित्रपटाच्या 80 लाख कॅसेक्ट विकल्या. 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या आशिकीच्या म्यूझित एल्बमनं तर रेकॉर्ड मोडला आणि कंपनीला यशाच्या शिखरावर पोहोचवलं. त्यानंतर गुलशन कुमार यांची ओळख कॅसेट किंग अशी झाली. तर काहीच काळात टी-सीरिजनं टिप्स आणि सारेगामाला मागे टाकत 65 टक्के मार्केट मिळवलं. प्रत्येक बड्या चित्रपटाचे राईट्स हे टी-सीरिजला मिळाले. तर 1997 मध्ये गुलशन कुमार यांची हत्या करण्यात आली.

12 ऑगस्ट 1997 रोजी गुलशन कुमार रोजच्या प्रमाणे पूजा करण्यासाठी मुंबईतल्या जीतनगर भागातील शिव मंदिरात गेले होते. ते मंदिर त्यांनी स्वत: त्या मंदिराचं इंटेरियर केलं होतं. सकाळी 10.40 मिनिटांनी मंदिरातून परत येताना, त्यांच्या गाडी जवळ जात असताना, एका माणसाने त्यांना बंदूक दाखवली. तर हे पाहताच ते म्हणाले हे काय करतायत? त्या माणसानं उत्तर दिलं की खूप पूजा केलीस, आता वर जाऊन कर.  हे बोलून त्या व्यक्तीनं त्यांच्यावर गोळी झाडली ती त्यांच्या डोक्याच्या बाजून गेली. गुलशन कुमार हे जवळपास असलेल्या घरांमध्ये हाक मारून मदतीसाठी बोलत होते. पण सगळ्यांनी दरवाजे बंद केले. गुलशन कुमार यांचा ड्रायव्हर रुपलालनं हल्लेखोरांवर कलश फेकला तर त्याच्यावर देखील हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. त्याच्या पायाला दोन गोळ्या लागल्या. गुलशन कुमार पळण्याचा प्रयत्न करत असताना कुणीही त्यांच्या मदतीला आलं नाही आणि त्या व्यक्तीनं त्यांच्यावर 16 गोळ्या झाडल्या. गुलशन कुमार यांच्या पाठीवर आणि मानेवर या गोळ्या झाडल्या. 30 मिनिटात तिथे पोलिस पोहोचले पण तोपर्यंत गुलशन कुमार यांची हत्या झाली होती. गुलशन कुमार यांना कूपर रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं आणि तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं आहे. 

गुलशन कुमार यांच्या हत्येमागचं कारणं?

अंडरवर्ल्डच्या धमक्यांना जे लोकं घाबरत नाही त्यांच्यासाठी असलेला हा इशारा होता. अबू सालेम या डॉनने त्यांच्याकडे 10 कोटींची मागणी केली होती. ‘वैष्णोदेवीत रोज लंगर लावतोस, आमच्यासाठीही काही कर,’ असं सालेम म्हणाला त्यांना म्हणाला होता. पण गुलशन कुमारनं पैसे देण्यास नकार दिला आणि पोलिसांकडेही तक्रार केली नाही.

हेही वाचा : 1982 च्या रेखा- धर्मेंद्रची जोडीसुद्धा ‘महाभारत’ फेम अभिनेत्यापुढे ठरली फिकी; अभिनेत्रीच्या सौंदर्याचीही चर्चाच नव्हती…

1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हाय अजनबी’ नावाच्या एका एल्बममध्ये ज्याची काही गाणी नदीम-श्रवण यांच्या जोडीच्या नदीम सैफी यांनी स्वत: गायले होते. नदीम यांची इच्छा होती की टी-सीरिजनं या एल्बमचे राइट्स खरेदी करून त्याला प्रमोट करायला हवं. पण गुलशन हे त्यासाठी तयार नव्हते. खरंतर गुलशन यांनी नदीम यांना सांगितलं की त्यांचा आवाज चांगला आहे. पण कसे बसे दोघे तयार झाले आणि टी-सीरिजनं हे राइट्स खरेदी केली. एल्बमच्या प्रमोशनसाठी व्हिडीओ देखील बनवला. पण यश मिळालं नाही. तर या अपयशासाठी नदीम यांनी गुलशन कुमार यांना जबाबदार ठरवले आणि याचं तुला उत्तर मिळेलं असं देखील सांगितलं.   




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here