तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहनांवर कारवाई केली जाणार आहे. अशा वाहन धारकांना पेट्रोल पंपावर इंधन बंदी करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे तसेच लवकरच अशा प्रकारचे धोरण आणण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. त्यामुळे नो पीयूसी न
.
वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यामुळे हवा प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. हवा प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) प्रत्येक वाहनाला लागू केले आहे. परंतु ही प्रमाणपत्रे वाहनधारक चुकीच्या पद्धतीने प्राप्त करून घेतात किंवा ती बोगस असल्याच्या तक्रारीही परिहावं विभागाला मिळाल्या आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहने रस्त्यावर आल्याने वायू प्रदूषणात वाढ होत आहे, असे प्रताप सरनाईक म्हणाले.
पुढे बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले, वाढत्या वायू प्रदूषणामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक वेगाने घसरत चालल आहे. त्याला बऱ्याच अंशी तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहने जबाबदार असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भविष्यात क्युआर कोड आधारित प्रदूषण नियंत्रणपत्र देण्यात येणार आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावर इंधन भरायला येणाऱ्या वाहनाची हवा गुणोत्तर निर्देशकांनुसार तपासणी केली जाईल. ज्यांच्याकडे वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असेल त्यांनाच इंधन दिले जाईल.
नो पीयूसी नो फ्यूएल
नो पीयूसी नो फ्यूएल अशा प्रकारचे कडक नियम असणारे धोरण लवकरच परिवहन विभागामार्फत आणण्यात येणार आहे, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. ते म्हणाले, पर्यावरणाचे संतुलन राखण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने घेणे आवश्यक आहे. आपल्या पिढीने भावी पिढीचाही विचार केला पाहिजे. त्या पिढीला शुद्ध हवा मिळावी, यासाठी आत्ताच वायू प्रदूषणावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा कडक नियमांची अंमलबजावणी करणे अपरिहार्य आहे.