Best Cars for Daily Use: शहरांच्या कक्षा रुंदावत असतानाच नोकरदार वर्ग या विस्तारीकरणात सर्वाधिक प्रभावित होताना दिसत आहे. नोकरीच्या निमित्तानं एके ठिकाणी वास्तव्य आणि शहराच्या दुसऱ्याच टोकावर Office असा लांबचा पल्ला अनेकजण गाठतात. काहीजण यासाठी सार्वजनिक वाहतुकीच्या सोयींचा पर्याय निवडतात, तर काही मंडळी मात्र खासगी वाहनांना पसंती देतात. फक्त नोकरी करणारी मंडळीच नव्हे, तर या न त्या कारणानं दर दिवशी मोठा प्रवास करणाऱ्यांचाही यातच समावेश होतो.
दैनंदिन प्रवासासाठी खासगी वाहनाची निवड करणाऱ्या मंडळींसाठी एक उत्तम कार अतिशय महत्त्वाची असते. बाईकच्या तुलनेत Comfert चा मुद्दा प्राधान्यस्थानी येताच कारलाच अनेकांची पसंती असते. अशा स्थितीत पेट्रोलवर जास्त खर्च होणार नाही, मायलेज चांगला असेल अशा अपेक्षा पूर्ण करणारी कार निवडली जाते. अशाच काही कारचे पर्याय पाहून घ्या…
Tata Tiago CNG- या कारमध्ये 1199cc चं 3 सिलेंडर इंजिन देण्यात आलं असून, यामध्ये प्रति सिलेंडर 4 वाल्व आणि DOHC तंत्राचा वापर करण्यात आला आहे. हे इंजिन 74 bhp पॉवर आणि 96.5 Nm इतका टॉर्क जनरेट करतं. सुरक्षिततेच्या दृष्टीनं कारमध्ये ड्युअल फ्रंट एयरबॅग्स, ISOFIX चाइल्ड सीट माउंट, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP), हिल होल्ड कंट्रोल आणि रिवर्स पार्किंग कॅमेरा देण्यात आला आहे. एक किलो सीएनजीमध्ये ही कार 26.49 किमी इतकं मायलेज देते. टाटा टिएगो या कारची एक्स शोरूम किंमत आहे 5.99 लाख रुपये. या कारचं टॉप वर्जन 9.49 लाखांमध्ये उपलब्ध आहे.
Maruti Suzuki Alto K10 CNG – 998cc इंजिनसह मारुतिची ही कार बाराजा विक्रीसाठी उपलब्ध असून, त्यात प्रति सिलेंडर 4 वाल्व आणि SOHC तंत्र देण्यात आलं आहे. या इंजिनमधून 56 bhp पॉवर आणि 82.1 Nm इतका टॉर्क जनरेट केला जातो. सुरक्षिततेचे निकष पाळत कारमध्ये 6 एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP), EBD आणि ABS देण्यात आलं आहे. 33.40 किमी इतकं अंतर ही कार एक किलो सीएनडीमध्ये ओलांजते. राहिला प्रश्न किमतीचा तर, या कारची एक्स शोरूम किंमत आहे 5.89 लाख रुपये.
Maruti Suzuki Celerio CNG – अल्टोप्रमाणेच 998cc चं इंजिन असणाऱ्या या कारचं मायलेज 34.43 किमी प्रति किलो सीएनजी इतकं आहे. या कारचं इंजिन 56 bhp पॉवर जनरेट करतं. तर, 82.1 एनएम इतका टॉर्क जनरेट करतं. 6 एअरबॅग, हिल होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP), EBD सह रिवर्स पार्किंग फिचर असणारी ही कार एक्स शोरूम 6.89 लाख रुपये इतक्या किमतीला विकली जाते.