राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण करावे, असे फर्मान शरद पवारांनी गेल्या आठवड्यात सोडले. या फर्मानाच्या अंमलबजावणीसाठी सुप्रिया सुळे, अजित पवारांनी बैठक घ्यावी, असेही आदेश त्यांंनी जारी केले. त्यानुसार शरद पवार गटाच्या नेत्यांनी दोन बैठ
.
शरद पवारांच्या मूक संमतीने का होईना कोल्हे, जानकरांनी अजित पवारांनी टीका केली असणार. त्यामुळे कोल्हे, जानकरांच्या आडून मिटकरींनी थेट शरद पवारांवरच निशाणा साधला आहे. त्यासाठी त्यांना अजित पवारांचा अप्रत्यक्ष पाठिंबाच आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कारण लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी शरद पवार अशी काहीतरी वक्तव्ये करतात. नवे पिल्लू सोडून देतात, असे अजित पवारांनीही म्हटले आहे.
जयंत पाटील, जानकर इच्छुक; सुप्रिया, कोल्हे, आव्हाड विरोधात : सूत्रांनी सांगितले की, अजित पवार गटासोबत जाण्यास जयंत पाटील, उत्तम जानकरांसह सोलापूर जिल्ह्यातील चार आमदार इच्छुक आहेत. तर हिंदुत्वाच्या मुद्यावर सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांचा कडाडून विरोध आहे. अजित पवारांसोबत जाणे म्हणजे हिंदुत्वाचा विचार स्वीकारल्यासारखा आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की, शरद पवार, सुप्रियांचा निर्णय मला मान्य असेल.
मिटकरींचा हल्लाबोल म्हणजे अप्रत्यक्ष संकेत
मंगळवारी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात सुप्रिया सुळे केंद्रात मर्यादित राहणार असतील तरच विलीनीकरण करावे, असा सूर व्यक्त झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर बुधवारी शरद पवार गटाची बैठक सुरू असताना अजित पवार गटाचे प्रवक्ते अा. मिटकरी म्हणाले की, आमच्या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयी कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र, जर एकत्र यायचे असेल तर आमच्या पक्षाच्या काही अटी-शर्ती आहेत. त्यातील एक म्हणजे अजित पवारांवर विखारी टीका करणाऱ्या नेत्यांनी नाक घासून माफी मागावी. त्यात पहिला नंबर उत्तमराव जानकर तर दुसरा नंबर अमोल कोल्हेंचा आहे.
रोहित पवारांसाठी दोघांना पदावरून हटवण्याची तयारी : रोहित पवार यांची नाराजी दूर करण्यासाठी शरद पवारांनी संघटनेतील दोघांना पदावरून हटवण्याची तयारी केली आहे. युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या जागी नवी नियुक्ती केली जाईल,असे सूत्रांनी सांगितले.
आ. जानकर : अजित पवार कोब्रा आहे. जंगलाला आग लागल्यावर पळून गेलेला बिबट्या म्हणजे अजित पवार.

खा. कोल्हे : आमचा काका राजकारणात नसतो. आम्हाला कोणी सोन्याचा चमचा देऊन राजकारणात आणलं नाही. माझा काका कोणीतरी एमबीबीएस होता म्हणून मला एमबीबीएसची सीट नाही मिळाली. मी स्वतःच्या कष्टानं डॉक्टर झालो.
यापूर्वीच्या अनेक धोक्यांमुळे अजित पवारांचा सावध पवित्रा
खुद्द शरद पवारांनी हात पुढे केला असताना अजित पवार मात्र त्यास अपेक्षित प्रतिसाद देत नाहीत. त्याविषयी सूत्रांनी सांगितले की, राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणे म्हणजे शरद गटाचा सत्तेत सहभाग असाच अर्थ आहे. भाजपसोबत शरद पवारांची हातमिळवणी असेही यातून स्पष्ट होते. मात्र, ही बाब जगापासून लपवावी. आपण भाजप नव्हे तर पुतण्यासोबत गेल्याचे चित्र निर्माण करावे, असा पवारांचा प्रयत्न आहे. तो भाजपच्या वरिष्ठांना मान्य नाही. दुसरीकडे एकत्रीकरणाचा प्रस्ताव म्हणजे साहेबांचे नवे पिल्लू आहे. त्यांना केवळ संभ्रम निर्माण करायचा आहे, शरद पवारांचेच विश्वासातील काही नेते असे सांगत आहेत. त्यामुळे अजित पवार सावध आहेत.