देशासाठी सेवा करण्याचे भाग्य लाभले, याचे मला आत्मिक समाधान आहे. आता क्रीडाधिकारी या भूमिकेतून खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन. देशभक्तीची जाणीव टिकवून ठेवणे, हीच माझी पुढील जबाबदारी आहे. देशासाठी केलेली
.
येथील भूमीपुत्र आणि भारतीय सैन्य दलातील सुभेदार बापू वंजारे यांनी तब्बल २२ वर्षे देशसेवा केली. सेवानिवृत्तीनंतर त्यांची महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागात पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल नेवासा येथे नागरी सत्कार करण्यात आला होता. औदुंबर चौकातील सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक सतीश मुळे होते. प्रमुख अतिथी म्हणून नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, ज्येष्ठ नेते रामभाऊ खंडाळे, करणसिंह घुले, मनोज पारखे, संजय सुखदान, मेजर दीपक देशमुख, डॉ. लक्ष्मणराव खंडाळे, बालेंद्र पोतदार, किशोर गारुळे, मनिषा लव्हाटे, पत्रकार गुरुप्रसाद देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. संयोजक मास्टर सुरेश लव्हाटे यांनी प्रास्ताविकात सुभेदार वंजारे यांनी शूटिंग या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर ४ सुवर्ण, २ रौप्य व ३ कांस्य, तर राष्ट्रीय स्तरावर १५ सुवर्ण, १५ रौप्य आणि १० कांस्य पदके जिंकत गावासह देशाचा गौरव वाढवल्याचे सांगितले.
सतीश मुळे, माऊली तोडमल, गुरुप्रसाद देशपांडे, मनोज पारखे, सुनील वाघ, डॉ. लक्ष्मण खंडाळे आदींनी मनोगत व्यक्त करून बापू वंजारी यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला सुनीलराव बाघ, सतीश गायके, दत्ता शिंदे, देविदास साळुंके, शशिकांत नळकांडे, राजेंद्र मापारी, महेश मापारी आदी उपस्थित होते.