Sara Tendulkar Relationship: भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर ही कायमच चर्चेत असते. कधी इन्स्टाग्राम पोस्टमुळे तर कधी कथित अफेअर्समुळे चर्चेत असलेल्या सारासंदर्भात एक थक्क करणारी माहिती समोर आली आहे. अगदी शुभमन गीलपासून ते वेगवेगळ्या अभिनेत्यांबरोबर लिंकअप करण्यात आलेल्या साराचं नुकतंच ब्रेकअप झालं आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण अगदी साराचे आई वडील म्हणजेच अंजली आणि सचिनपर्यंत पोहचलं होतं. मात्र शेवटच्या क्षणी साराच्या प्रियकरानेच नकार दिला अशी माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे साराचा हा प्रियकर एक प्रसिद्ध अभिनेता आहे.
काही महिने सुरु होतं अफेअर
सारा तेंडुलकरला डेट करणाऱ्या या अभिनेत्यांचं सारासोबतचं अफेर काही महिने सुरु होतं. मात्र दोघांचेही पालक एकमेकांना भेटल्यानंतर या अभिनेत्यानेच नात्यातून माघार घेत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला, अशी बातमी ईटाइम्सने दिली आहे. ज्या अभिनेत्याबद्दल आपण बोलतोय त्याचं नाव आहे, सिद्धार्थ चतुर्वेदी!
मे महिन्यात एकत्र दिसले
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ‘फिल्मफेअर’ने सिद्धार्थ आणि सारा एकत्र दिसल्याचं वृत्त दिलं होतं. मात्र या दोघांनी कधीच यासंदर्भात सार्वजनिक पद्धतीने भाष्य केलं नाही. सिद्धार्थ हा बीग बी अमिताभ यांची नात नाव्या निलवाणीला डेट करत असल्याचीही चर्चा होती. तर दुसरीकडे सारा आणि क्रिकेटपटू शुभमन गिलच्या कथित अफेअरची जोरदार चर्चा होती. मात्र या दोन्ही जोडप्यांनी आपल्या नात्याबद्दल कोणतही भाष्य केलं नव्हतं.
एकमेकांच्या घरच्यांना भेटले अन्…
सारासोबतचं नातं पुढे न्यायचं नाही असं सिद्धार्थनेच ठरवलं, असं ‘ईटाइम्स’ने म्हटलं आहे. या दोघांचं ब्रेकअप नेमकं का झालं हे स्पष्ट झालेलं नाही. तरीही या वेबसाईटने सदर प्रकरणाशीसंबंधित निकटवर्तीयने, “दोघांचं नुकतंच ब्रेकअप झालं आहे. सिद्धार्थने नातं संपुष्टात आणण्यासाठी पुढाकार घेतला. दोघेही एकमेकांच्या घरच्यांना भेटल्यानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला,” असं सांगितलं. दोघेही एकमेकांच्या घरच्यांना भेटल्यानंतर त्यांनी पुढे न जाण्याचा निर्णय घेतल्याचं निकटवर्तीयाने स्पष्ट केलं.
लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
सिद्धार्थ आता लवकरच ‘धकड 2’ आणि ‘दिल का दरवाजा खोलो ना डार्लिंग’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. ‘धकड 2’मध्ये सिद्धार्थ तृप्ती डिमरीसोबत झळकणार आहे. तर ‘दिल का दरवाजा खोलो ना डार्लिंग’ चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन आणि कामिका गाबी दिसणार आहेत.