Saina Nehwal on her journey: भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल (Saina Nehwal) हिचं नाव आज जगभर ओळखलं जातं. 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये (2012 London Olympics) ब्रॉन्झ मेडल जिंकणारी सायना लाखो मुलींसाठी एक आदर्श ठरली आहे. पण या यशामागे केवळ मेहनतच नाही, तर तिच्या आईची असीम माया आणि त्यागही आहे. सायनाने स्वतः लल्लंटॉपला दिलेल्या मुलाखतीदरम्यान आईबद्दलच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. तिच्या या यशामागे तिच्या आईची किती मेहनत आहे हे तिने सांगितले आहे.
दिला बालपणीच्या आठवणींना उजाळा
सायनाने ‘लल्लनटॉप’च्या ‘गेस्ट इन द न्यूजरूम’ या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत तिच्या बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सायनाने कमी वयातच बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली होती. यासाठी तिच्या आईने खूप मेहतनत घेतली होती. याबद्दल सायना म्हणाली की, “तेव्हा मला फिजिओ ट्रेनर्सविषयी काहीच माहिती नव्हती. दिवसा ट्रेनिंग केल्यावर माझी आई रात्रीभर बसून माझी मालिश करायची. आज जेव्हा याचा विचार करते तेव्हा वाटतं की, आईला कसं कळायचं की मला पुढच्या दिवशी रिकव्हर व्हायचं आहे? त्यांना एवढी माहिती कशी होती?” याशिवाय सायनाने हे ही सांगितले की, ” मी खूप लकी होते कारण माझ्या आईला माहित होते कि मला मदत कशी करायची हे माहित होते. माझा पालकांना हे ही माहित होत चांगले जेवण देऊन मला मजबूत बनवणे गरजेचे आहे.”
हे ही वाचा: विराटच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! कोहली पुन्हा दिसू शकतो पांढऱ्या जर्सीत… मिळाली मोठी ऑफर
मित्र-मैत्रीण सुटले
सायनाने हेही सांगितले की, तिला बालपणी मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवता आला नाही, पण त्याचं काहीही वाईट वाटत नाही. “मी जे काही केलं ते देशासाठी केलं. फोडियमवर उभं राहून देशाचा अभिमान वाढवणं, हीच खरी कमाई आहे.”
हे ही वाचा: Video: निसर्गानेही विराटला ठोकला सलाम! पक्ष्यांनी किंग कोहलीला दिला ट्रिब्यूट, बेंगळुरू स्टेडियमवरती दिसले अद्भुत दृश्य
सायनाचे यश
सायनाच्या महत्त्वाच्या यशांमध्ये 2012 चं ऑलिम्पिक ब्रॉन्झ, वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील दोन मेडल्स, आणि कॉमनवेल्थ गेम्समधील पाच पदकांचा समावेश होतो. ती भारताची पहिली वर्ल्ड नंबर वन बॅडमिंटनपटू ठरली.
हे ही वाचा: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर, ‘या’ खेळाडूला बनवले कर्णधार! करुण नायरचे झाले दमदार पुनरागमन
सायनाचं यश हे केवळ कोर्टवरचं नाही, तर आईच्या मायेच्या रुपात तिच्या पाठीमागे असलेल्या आधाराचंही फलित आहे.