पिशोर ते कोळंबी रस्त्यावर गेल्या दीड वर्षांपासून वादात असलेला आणि रखडलेल्या अवस्थेत असलेला पूल हा या परिसरातील नागरिकांसाठी आणि विशेषतः शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आगामी पावसाळी हंगामात पावसाचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता लक्षात घेता, या पुल
.
ही बाब अत्यंत गंभीर असून, स्वतः आमदार संजना जाधव यांनी प्रत्यक्ष कामावर जाऊन पुलाची सविस्तर पाहणी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
दरम्यान शेतकरी कृष्णा मोकासे यांनी सांगितले की, जुन्या पूलाची जागा सोडून नवीन पूल माझ्या शेताकडे सरकवलेला आहे. रस्त्याचा मध्यभाग लक्षात न घेता पूल माझ्या शेतात घातलेला आहे. तरी माझी काहीही हरकत नाही मी २०२३ पासून याबाबत तक्रारी दिलेल्या आहेत. सध्या माझे प्रकरण संभाजीनगर येथील सत्र न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. या पाहणी दौऱ्यात तहसीलदार, विद्याचरण कडवकर आदी हजर होते.