Cooking Oil Bad for Heart Health : हार्ट अटॅकपासून दूर राहायचं असेल तर ‘या’ 4 तेलांचा वापर टाळा; इतर आजारांपासूनही होईल बचाव

0


Cooking Oil Bad for Heart Health : भारतात फारच कमी घरं असतील जिथं कमी तेलात जेवण बनवलं जातं. तेल हे प्रत्येक स्वयंपाकघरातलं एक महत्त्वाचं घटक आहे. पण आजकाल आपण पाहतो की वयाच्या अवघ्या 20-25 व्या वर्षीही लोकांना हार्ट अटॅक येतो आणि त्यात बरेच जण आपला जीवही गमावतायत.

हार्ट अटॅकचं एक मोठं कारण 

रक्तात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणं आणि यामागे आपल्या रोजच्या वापरातलं काही हेल्दी वाटणारे तेलही असू शकतात. आपल्याला वाटतं की ऑर्गेनिक किंवा महागडं तेल म्हणजे आरोग्यासाठी चांगलं. पण संशोधनातून असं समोर आलंय की काही तेलं आपल्या हृदयासाठी खूपच हानिकारक असतात.

तेल इतकं वाईट का?

एका रिपोर्टनुसार, काही तेलं तुमचं ‘बॅड कोलेस्ट्रॉल’ (LDL) वाढवतात आणि ‘गुड कोलेस्ट्रॉल’ (HDL) कमी करतात. त्यामुळे हृदयाचे रोग होण्याचा धोका वाढतो. काही तेलांमध्ये नकली ट्रान्स फॅट्स असतात, जे शरीरासाठी खूपच घातक असतात. तसंच काही रिफाइंड तेलांमध्ये ओमेगा-6 भरपूर असतो. हे अति प्रमाणात घेतल्यास शरीरात सूज निर्माण होऊ शकते, जी हृदयविकारांचं कारण ठरू शकते.

या 4 प्रकारच्या तेलांपासून राहा दूर 

1. मार्जरीन

मार्जरीन हे ट्रान्स फॅट्सचं मोठं स्रोत आहे. याचा जास्त वापर केल्यानं हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येऊ शकतो. काही देशांनी हे तेल बंद केलं असलं तरी काही ठिकाणी अजूनही ते मिळतं.

2. कॉर्न तेल (मका तेल)

कॉर्न तेलात ओमेगा-6 फॅट्स खूप जास्त असतात. याचा अती वापर केल्यानं शरीरात सतत सूज राहू शकते. त्यामुळे हृदयविकार किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो. तसंच या तेलात ओमेगा-3 नसल्यामुळे ते हृदयासाठी फायदेशीर मानलं जात नाही.

3. नारळ तेल

बऱ्याच लोकांना वाटतं की नारळ तेल आरोग्यदायी असतं. पण संशोधन सांगतं की यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स खूप असतात, जे ‘बॅड कोलेस्ट्रॉल’ वाढवतात. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. अमेरिकन हार्ट असोसिएशन आणि WHO दोघंही सांगतात की सॅच्युरेटेड फॅट्सचा वापर मर्यादित ठेवावा.

4. वारंवार गरम केलेलं तेल

कोणतंही तेल असो, जर ते पुन्हा पुन्हा गरम केलं तर त्याचे फायदे नाहीसे होतात आणि ते तेल आरोग्यास घातक ठरतं. असं तेल खाल्ल्याने रक्तदाब, कोलेस्ट्रॉल वाढू शकतो आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये सूज येऊन अडथळे निर्माण होतात.

शेवटी काय करावं?

या 4 प्रकारचे तेल शक्यतो टाळा किंवा खूप कमी प्रमाणात वापरा. तेल निवडताना फक्त ब्रँड, महागडं असणं किंवा ‘ऑर्गेनिक’ लिहिलेलं पाहू नका. त्याच्या घटकांवर आणि आरोग्यावर होणाऱ्या परिणामावर लक्ष द्या.

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही.)




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here