हिंगोली ते कनेरगाव मार्गावर माळहिवरा शिवारात एका कंटेनर मधून ५९ म्हैसवर्गीय जनावरे बुधवारी बासंबा पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. सदर जनावरे हरियाणा येथून हैदराबादकडे नेली जात असल्याची प्राथमिक चौकशीमध्ये स्पष्ट झाले आहे.
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कंटेनर मधून मोठ्या संख्येने जनावरे हैदराबाद कडे नेली जात असल्याची माहिती विदर्भातील गोरक्षकांना मिळाली होती. त्यावरून गोरक्षकांनी त्या कंटेनरचा पाठलाग सुरू केला होता, त्यामुळे कंटेनर चालकांनी कंटेनर भरधाव वेगाने चालविण्यास सुरुवात केली. मात्र गोरक्षकांनीही त्याचा पाठलाग सुरू ठेवला.

हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर माळहिवरा शिवारात गोरक्षकांनी कंटेनर अडवून बासंबा पोलिसांच्या हवाली केला. पोलिसांनी कंटेनर चालकासह तिघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये म्हैसवर्गीय 59 जनावरे आढळून आली. यामध्ये ५३ जिवंत होती, तर सहा जनावरे मयत झाली होती.
पोलिसांनी जिवंत असलेली सर्व जनावर ताब्यात घेतली आहे. बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास आडे, उपनिरीक्षक मदन गव्हाणे, जमादार कैलास गुंजकर, खंडेराव नरोटे यांच्या पथकाने कंटेनर चालकाची प्राथमिक चौकशी केली असता सदरील जनावरे हरियाणा राज्यातून हैदराबाद कडे नेली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी बासंबा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हे ही वाचा…
हिंगोली शहरासह 4 पोलिस ठाण्यात 10 गुन्हे दाखल:सराईत आरोपी एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे आदेश
हिंगोली शहरासह जिल्ह्यातील चार पोलिस ठाण्यात चोरी, जबरी चोरी फसवणूक यासारखे दहा गुन्हे असलेल्या सेनगाव तालुक्यातील हनकदरी येथील एका गुन्हेगारास एक वर्ष स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बुधवारी दिले आहेत. पूर्ण बातमी वाचा…
ट्रॅक्टर मालकच निघाला चोर:हिंगोली तहसील कार्यालयातून वाळूने भरलेले ट्रॅक्टर पळविणाऱ्यास विदर्भातून अटक
हिंगोली तहसील कार्यालयातून वाळूने भरलेले ट्रॅक्टर चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच हिंगोली शहर पोलिसांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजवरून माहिती घेत विदर्भातील दारव्हा डिग्रस येथून एकास बुधवारी ता. २८ अटक केली आहे. ट्रॅक्टर मालकानेच सदर ट्रॅक्टर पळविल्याचे स्पष्ट झाले आहे. पूर्ण बातमी वाचा…