Murder of friend on suspicion of having an affair with mother, incident in Saundane, revealed through mobile messages | आईसोबत प्रेम संबंधाच्या संशयावरुन मित्राचा खून: सौंदणेतील घटना, मोबाइलच्या मेसेजवरुन उघड‎ – Solapur News

0



आई सोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयावरुन नेताजी तानाजी नामदे (वय ३२) याचा खून करुन मृतदेह शेतात पुरुन पुरावा नष्ट केल्याची घटना सौंदणे (ता.मोहोळ) येथे समोर आली. या प्रकरणी आरोपी उदय पुजारी (आरोपीचे नाव बदलले) विरुध्द मोहोळ पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल

.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तानाजी तुकाराम नामदे (वय ५८, रा. सौंदणे) यांनी मुलगा नेताजी तानाजी नामदे (वय ३२) दि. २४ मे रोजी सकाळी ७.४५ च्या सुमारास घरातून दळणासाठी गेला होता, तो परत आला नसल्याने हरवल्याची तक्रार मोहोळ पोलिसांत दाखल केली होती. गावातीलच आदित्य वाघमारे याने नेताजी यास सायकलवरून जाताना पाहिल्याचे सांगितले होते. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपास केला असता मृत नेताजी नामदे याला मोबाईलवरून आरोपीने व्हॉटसअॅपवर मेसेज पाठवल्याची माहिती मिळाली. परंतु त्याचा मोबाईल बंद होता. फिर्यादीच्या संशयावरुन पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले. मित्रानेच आईबरोबर प्रेमसंबंध ठेवल्याच्या कारणावरून खून केल्याची कबुली दिली. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

आरोपीने शेतात मृतदेह पुरल्याची दिली कबुली संशयावरुन ताब्यात घेतलेल्या आरोपीने तपासात मृतदेह शेतामध्ये पुरल्याचे सांगितले. मोहोळचे कार्यकारी दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत पुरलेल्या ठिकाणावरुन मृतदेह बाहेर काढला होता. सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणाचा तपास सपोनि नितीन आतकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून, गुन्हे शाखेच्या पेनूर, बीट मधील अधिकारी इतर अंमलदारांनी तत्परतेने तपास करून हा गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता दि. २ जून पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. आरोपीच्या आईशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन खून झाल्याची घटना समोर आल्याने महिलेचे नाव उघड होऊ नये, म्हणून आरोपीचे नाव बातमीत बदलून वापरले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here