मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला! हार्दिकने 3 नव्या खेळाडूंना दिली एलिमिनेटर मॅचच्या प्लेईंग 11 मध्ये संधी

0


IPL 2025: आयपीएल 2025 चा एलिमिनेटर सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स (Mumbai Indians VS Gujrat Titans) यांच्यात 30 मे रोजी खेळवला जात आहे. महाराजा यादविंद्र सिंह इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम पंजाब येथे हा सामना सुरु असून यात विजेता संघ क्वालिफायर 2 चा सामना खेळेल. सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये टॉस पार पडला असून हा टॉस मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने जिंकला आणि त्याने फलंदाजी निवडली. 

महाराजा यादविंद्र सिंह इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना पार पडत आहे. सामन्यापूर्वी झालेला टॉस मुंबई इंडियन्सने जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. तर गुजरातला प्रथम गोलंदाजीसाठी आव्हान दिलं. यावेळी मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग 11 मध्ये कर्णधार हार्दिक पंड्याने तीन बदल केले. आयपीएल 2025 मध्ये मुंबईच्या संघाचा भाग असलेले फलंदाज विल जॅक्स, रायन रिकेलटन आणि कॉर्बिन बॉश हे त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कमिटमेंटसाठी मायदेशी परतले आहेत. त्यांच्या जागी जॉनी बेअरस्टो, रिचर्ड ग्लीसन आणि चरिथ असलंका यांना संघात संधी दिली आहे. हार्दिकने या तिघांपैकी जॉनी बेअरस्टो, रिचर्ड ग्लीसन यांना प्लेईंग 11 मध्ये संधी दिली असून 22 वर्षांच्या राज अंगद बावा यांना सुद्धा एलिमिनेटर सामन्यात  संधी दिली आहे. तर गुजरातच्या प्लेईंग 11 मध्ये शुभमन गिलने 2 बदल केले असून जॉश बटलर ऐवजी कुसल मेंडिस आणि अरशद ऐवजी वॉशिंग्टन सुंदर यांना प्लेईंग 11 मध्ये संधी दिली आहे 

मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11 :

रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन

गुजरात टायटन्सची प्लेईंग 11 :

शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, कुसल मेंडिस (विकेटकिपर), शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, जेराल्ड कोएत्झी, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here