IPL 2025 :आयपीएल 2025 चा एलिमिनेटर सामना 30 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात पार पडला. या सामन्यात मुंबईने गुजरातवर 20 धावांनी विजय मिळवून गुजरातचा पराभव केला. यामुळे गुजरात आयपीएलमधून आता थेट बाहेर पडली असून मुंबई इंडियन्सने फायनलच्या वाटचाल कायम ठेवली आहे. मुंबई इंडियन्सने गुजरातला पराभूत करून क्वालिफायर 2 सामन्यात एंट्री घेतली आहे.
आयपीएल 2025 च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी करून 5 विकेट गमावून 228 धावा केल्या. यात मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावा रोहित शर्माने (81) केल्या. मुंबई इंडियन्सने गुजरातला विजयासाठी 229 धावांचे आव्हान दिले होते.
गुजरात टायटन्सकडून विजयाचे आव्हान पूर्ण करत असताना साई सुदर्शनने 80, वॉशिंग्टन सुंदरने 48, कुसल मेंडिसने 20, शेरफेन रदरफोर्डने 24, राहुल तेवाटियाने 16, शाहरुख खानने 13 धावा केल्या. मात्र गुजरात टायटन्सचे फलंदाज विजयाचं आव्हान पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले. 6 विकेट गमावून ते 208 धावा करू शकले त्यामुळे 20 धावांनी मुंबई इंडियन्सचा विजय झाला.
आता मुंबई इंडियन्स रविवारी 1 जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्स सोबत क्वालिफायर 2 सामना खेळेल. या सामन्यात विजयी होणारा संघ ३ जून रोजी आरसीबी विरुद्ध फायनल सामना खेळेल.
मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11 :
रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन
गुजरात टायटन्सची प्लेईंग 11 :
शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, कुसल मेंडिस (विकेटकिपर), शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, जेराल्ड कोएत्झी, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा