Jonny Bairstow score 44 runs while playing with mumbai indians in ipl 2025 eliminator match mi vs gt

0


IPL 2025 : आयपीएल 2025 चा एलिमिनेटर सामना हा 30 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स (Mumbai Indians VS Gujrat Titans) यांच्यात खेळवला जात आहे. महाराजा यादविंद्र सिंह इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम पंजाब येथे हा सामना सुरु असून यात विजेता ठरणारा संघ क्वालिफायर 2 चा सामना खेळेल. सामन्याचा टॉस मुंबई इंडियन्सने जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी प्लेईंग 11 मध्ये कर्णधार हार्दिक पंड्याने जॉनी बेअरस्टोला संधी दिली. जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड ठरला होता. मात्र सीजनच्या मध्यातच मुंबईकडून त्याला बोलावणं आलं आणि पहिल्याच सामन्यात त्याने जबरदस्त फलंदाजी केली. 

मेगा ऑक्शनमध्ये राहिला होता Unsold : 

जॉनी बेअरस्टो हा इंग्लंडचा स्टार फलंदाज असून त्याने याआधी आयपीएलचे 51 सामने खेळून त्यात 1636 धावा सुद्धा केल्या आहेत. जॉनी बेअरस्टोने आयपीएलमध्ये तब्बल 2 शतक आणि 9 अर्धशतक सुद्धा ठोकले आहेत. आयपीएल 2024 मध्ये जॉनी बेअरस्टो पंजाब किंग्सकडून खेळला होता. मात्र आयपीएल मेगा ऑक्शन 2025 पूर्वी त्याला रिटेन करण्यात आलं नाही. ज्यामुळे त्याला मेगा ऑक्शनमध्ये उतरावे लागले, यात जॉनी बेअरस्टोची बेस प्राईज 2 कोटी होती. मात्र त्याला कोणत्याही फ्रेंचायझीने बोली लावून करारबद्ध केलं नाही. ज्यामुळे तो अनसोल्ड राहिला. 

मुंबई इंडियन्सने दिली संधी : 

भारत – पाक तणावामुळे आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली, त्यामुळे सीजन 3 जून पर्यंत लागला. त्यामुळे आयपीएल 2025 मध्ये मुंबईच्या संघाचा भाग असलेले फलंदाज विल जॅक्स, रायन रिकेलटन आणि कॉर्बिन बॉश यांना त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कमिटमेंटमुळे मायदेशी परतावे लागले. त्यामुळे त्यांच्याजागी मुंबई इंडियन्सने रिचर्ड ग्लीसन, चरिथ असलंका सोबत जॉनी बेअरस्टोला सुद्धा संघात संधी देण्यात आली. हार्दिकने जॉनी बेअरस्टोला गुजरात विरुद्ध मुंबई सामन्यात प्लेईंग 11 मध्ये संधी दिली. जॉनी बेअरस्टोने या संधीचं सोनं केलं. रोहित शर्मा आणि जॉनी बेअरस्टोची जोडी ओपनिंगसाठी उतरली यावेळी जॉनी बेअरस्टोने तुफान फटकेबाजी करून 22 बॉलमध्ये 47 धावा केल्या. त्याने 4 चौकार आणि 3 षटकार ठोकले. जॉनी बेअरस्टो अर्धशतक पूर्ण करेल असं वाटत असताना साई किशोरने त्याला बाद केले. 

मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11 :

रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन

गुजरात टायटन्सची प्लेईंग 11 :

शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, कुसल मेंडिस (विकेटकिपर), शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, जेराल्ड कोएत्झी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here