Tortured by saying ‘let’s get married’, turned away when it was a girl! Case registered against accused in Hingoli | ‘लग्न करू’ म्हणत केला अत्याचार: मुलगी झाली तर पाठ फिरवली! हिंगोलीत आरोपीवर गुन्हा दाखल – Hingoli News

0



हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात महिलेस लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार केला. त्यानंतर महिलेस मुलगी झाल्याने सांभाळण्यास नकार देऊन जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका तरुणा विरुध्द हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 30 रात्री गुन्हा दा

.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली पोलिस ठाण्यांतर्गत एका गावातील महिला रोजमजूरीचे काम करते. त्या ठिकाणी फरदीन पठाण हा देखील कामाला येत होता. यावेळी फरदीने याने त्या महिलेच्या कुटुंबात कोणी नसल्याने तिच्या असहायतेचा गैरफायदा घेत तिला लग्नाचे अमिष दाखविले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. यामध्ये सदर महिला गरोदर राहिली. यावेळी फरदीन याने त्या महिलेस लग्न करून सांभाळण्याचे वचन दिले. मात्र त्या महिलेस मुलगी झाल्यानंतर फरदीन याने तिला टाळू लागला होता. सदर महिलेने लग्नाची मागणी केल्यानंतर त्याने महिलेस मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकारामुळे त्या महिलेने लहान मुलीसह थेट हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी फरदीन पठाण याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस उपाधिक्षक आंबादास भुसारे, पोलिस निरीक्षक शामराव डोंगरे, उपनिरीक्षक राहुल घुले, उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे, जमादार राहूल गोटरे, बाळासाहेब खोडवे, आकाश पंडीतकर, रमेश जाधव यांच्या पथकाने तातडीने गावात भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी फरदीन पठाण यास ताब्यात घेतले असून त्याची अधिक चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here