करंजा–रेवस पुलामुळे बाधित मच्छीमार व शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची मागणी

0

उरण दि १५(विठ्ठल ममताबादे )

 रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीत करंजा–रेवस पुलाच्या कामामुळे जीवन उद्ध्वस्त झालेल्या मच्छीमार व शेतकरी बांधवांच्या नुकसानभरपाईच्या प्रश्नावर खासदार  सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आणि आमदार महेंद्र दळवी यांनी ठोस भूमिका घेतली.या तिघांनी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे स्पष्ट मागणी केली की, “करंजा परिसरातील मच्छीमार व शेतकरी यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यात यावी. त्यांना झुलवून ठेवणे सहन केले जाणार नाही.”यावर जिल्हाधिकारी महोदयांनी “मच्छीमार विभागाला त्वरित आदेश दिले जातील व नुकसानभरपाई लवकरात लवकर दिली जाईल,” असे ठोस आश्वासन दिले.

या बैठकीस चाणजे ग्रामपंचायत सरपंच अजय म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य सिताराम नाखवा, सचिन रमेश डाऊर, कुंदन नाखवा, मनोहर थळी, वेदांत नाखवा, संस्कृती कोळी, धरती कोळी, सुमीत थळे, जगन कोळी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनास सांगण्यात आले की, “आमचा लढा आमच्या हक्कासाठी आहे. आश्वासने आम्ही अनेक ऐकली, आता कृती हवी!”प्रशासनाने या मागण्यांची गंभीर दखल घेऊन तातडीने नुकसानभरपाई देण्यासाठी पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी सर्वच ग्रामस्थांतून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here