दुपारी भात खाल्ल्यानंतर सुस्ती का येते? ही झोप आवरायची कशी, या टिप्स जाणून घ्या

0


Health Tips In Marathi: दुपारी भात खाल्ल्यावर झोप येते, हे अनेकदा तुम्ही नोटिस केले असेल. पण दुपारच्या जेवणात भात खाल्ल्यावर सुस्ती का येते, असा प्रश्न तुम्हाला पडलाय का? तर जाणून घेऊया यामागचे कारण?

भात खाल्ल्यानंतर झोप येण्याचे मुख्य कारण म्हणजे भातातील कार्बोहायड्रेट (कार्बोदक) . भात खाल्ल्यानंतर शरीरात त्याचे पचन सुरू होते. तांदळातील कार्बोदकांचे रुपांतर ग्लुकोजमध्ये होते आणि ग्लुकोज इन्शलिनला खेचून घेते. जसे जसे इन्शुलीन वाढू लागते तसेतसे शरीरात हार्मोन्सही वाढतात. त्यामुळं शरीर सुस्त होते आणि झोपही लागते. 

इन्सूलिनमुळं मेंदूतील ट्रिप्टोफेन नावाचे एक अमीनो अॅसिड सेरोटोनिनमध्ये रूपांतरित होते. सेरोटोनिन झोप येण्यास मदत करते. सेरोटोनिननंतर मेलाटोनिन तयार होते. जे झोप येण्याची प्रक्रिया नियंत्रित करते. या प्रक्रियेनंतर भात खाल्ल्यानंतर मेंदूत झोप येण्यास मदत करणारे घटक तयार होतात त्यामुळं झोप येते. 

जर आपल्या आहारात कार्ब्सयुक्त पदार्थांचा समावेश असेल तर भात कमी प्रमाणात खा. शिवाय भात खाल्ल्यानंतर थोड्यावेळासाठी शतपावली करा. जर तुमच्या आहारात 25 टक्क्यांपेक्षा जास्त कार्ब्स असतील तर तुम्हाला जास्त सुस्ती येऊ शकते. 

भात खाल्ल्यानंतर येणारी झोप कशी आवरावी?

भात खाल्ल्यानंतर झोप आवरत नसेल तर अशा मंडळींनी भात खाण्याचं प्रमाण कमी करावं. त्याऐवजी किनोआ, लापसी, मल्टीग्रेन भाकरी अशा पदार्थांचे सेवन करावं. 

भाताला पर्याय म्हणजे ब्राइन राईस हा चांगला पर्याय आहे. हा भाताचा आणखी एक उपयुक्त पदार्थ आहे. 

भात खाल्ल्यानंतर बडिशेप चावून खाल्ल्याने पचन योग्य पद्धतीने होते.

भात खाल्ल्यानंतर गोडाचा पदार्थ खावू नका त्याऐवजी ग्रीन टी प्या. त्यामुळं पचन क्रिया सुधारते. 

(वरील माहिती सर्वसामान्य अनुभव आणि संदर्भांवर आधारित आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही. )




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here