काँग्रेस पक्षात मला सातत्याने डावलण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी केला आहे. काँग्रेस पक्षाच्या राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आज आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे अधिकृत जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद
.
काँग्रेस पक्षात आपल्याला अनेकदा डावलण्यात आले असल्याचा आरोप संग्राम थोपटे यांनी केला आहे. काँग्रेस पक्षात अनेक वर्षांपासून मी आणि माझ्या वडिलांनी देखील काम केले आहे. त्यामुळे दुःख वाटत आहे. मात्र तालुक्याच्या विकासासाठी, तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी हा निर्णय आम्ही घेतला असल्याचे संग्राम थोपटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मी कोणाच्याही दबावाला कधी बळी पडलो नाही. लोकसभा निवडणुकीत देखील तुम्ही पाहिले असेल की, भोर तालुक्यात लोकसभेच्या निवडणुकीत देखील महा विकास आघाडीचे काम आम्ही प्रामाणिकपणे केले होते. महा विकास आघाडीचा धर्म पाळत आम्ही महा विकास आघाडीचे काम केले. आम्ही काम केले म्हणजे कोणावर उपकार केले नाहीत. मात्र, जे केले ते सांगायला काही हरकत नसल्याचे थोपटे यांनी म्हटले आहे. इतरही अनेक जबाबदारी मला पक्षाने दिली. त्या सर्व जबाबदाऱ्या आपण पार पाडल्या असल्याचे थोपटे यांनी म्हटले आहे.
कोण आहेत संग्राम थोपटे?
- सोनिया गांधीचे निकटवर्तीय आणि काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे यांचे संग्राम थोपटे पुत्र आहेत. संग्राम थोपटे यांना वडिलांपासून राजकीय वारसा मिळाला आहे.
- 2002 मध्ये संग्राम थोपटे भोर पंचायत समितीमध्ये उपसभापती झाले होते.
- 2009 मध्ये विधानसभा निवडणूक लढवत ते भोर विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. त्यानंतर 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत विजयी होत हॅट्रिक केली.
- 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी दादा गटाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या विरोधात संग्राम थोपटे यांना पराभव स्वीकारावा लागला.
- संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे यांनी महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष रुजवण्यासाठी आणि वाढविण्यासाठी मोठे योगदान दिले. सध्याच्या अनेक बड्या नेत्यांना अनंतराव थोपटे यांनी त्यांच्या काळात निवडणूक लढवण्यासाठी पक्षाच तिकीट देऊन संधी दिली होती. त्यामुळे आजही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
- 40 वर्षांपासून भोर विधानसभेवर थोपटे कुटुंबियांचे वर्चस्व आहे. सहा वेळा अनंतराव थोपटे आमदार झाले आहेत. 3 वेळा संग्राम थोपटे आमदार म्हणून निवडून आले आहेत. अनंतराव थोपटे सलग 14 वर्ष मंत्री राहिले आहेत. पश्चिम महाराष्ट्रमधील काँग्रेसचे मोठे नाव म्हणून थोपटे यांची ओळख आहे.