वसमत शहरातील मदिना चौक भागातील अपघात प्रकरणात वसमत शहर पोलिस ठाण्यात हायवा चालकावर अपघाताचा तर मालकावर गौण खनीज वाहतूकीसाठी बनावट पावत्या तयार करून शासनाची फसवणुक केल्या प्रकरणी रविवारी ता. 4 गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी चालकाचा शोध सु
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील विटभट्टीसाठी परभणी येथून माती आणणाऱ्या हायवा चालकाचे शहरातील मदिना चौकात वाहनावरील नियंत्रण सुटले. या अपघातात यास्मीन मोईनखान (27 रा. मानमाड), शोएब खान जलील खान (14, रा. कुरुंदा) या दोघांचा मृत्यू झाला तर इतर चौघे जण जखमी झाले आहेत. जखमींवर वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहेत. तर एका जखमीची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. या अपघातानंतर हायवा चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे.
या प्रकरणी खतिजा बेगम यांनी दिलेल्या तक्रारीवरून हायवा चालकावर हायवा निष्काळजीपणे व भरधाव वेगाने चालवून दोघांच्या मृत्यूस तसेच इतरांना जखमी करण्यास कारणीभूत ठरला. तसेच अपघाताची माहिती न देता पळून गेल्या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक शिवाजी बोंडले पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, याच प्रकरणात ग्राम महसूल अधिकारी संजय धाडवे यांनी तक्रारी दिली की, हायवा मालक शेख रफत (रा. शुक्रवारपेठ , वमसत) याने गौण खनीज वाहतुक परवानाच्या बनावट पावत्या तयार करून विना परवाना गौण खनीज वाहतूक करून शासनाची फसवणुक केली आहे. या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात शेख रफत याच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, उपनिरीक्षक बोंडले पुढील तपास करीत आहेत.